महिला रुग्णालयात दाखल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत इंडी आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मार्च काढला. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावर (एसआयआर) प्रश्न उपस्थित करत विरोधकांकडून हे आंदोलन सुरू आहे.
अशातच या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी चालताना काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनाही त्यांनी गर्दीत मागे लोटल्याचे काही व्हिडीओंमध्ये दिसत आहे. दरम्यान, याच गोंधळात राहुल गांधींनी एका महिला पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे.
राहुल गांधी यांनी आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या तीन महिन्यांच्या गर्भवती महिला पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप समोर आला आहे. तीन महिन्यांची गर्भवती महिला पत्रकार रिचा पराशर यांना धक्काबुक्की झाल्याची बाब भाजपने उघडकीस आणली असून या कथित घटनेत पत्रकार खाली पडून जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचा दावाही भाजपने केला आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
'वन इंडिया'साठी काम करणाऱ्या पत्रकार रिचा पराशर या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात कर्तव्य बजावत असताना राहुल गांधी यांनी त्यांच्या खांद्याला पकडून खाली ढकलून दिले. तसेच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीही धक्काबुक्की केल्याचे त्यांनी सांगितले.
'हिंदूंच्याच दुकानातून बिर्याणी खरेदी करा' बंगालमध्ये लागले पोस्टर
निवडणूक आयोगाविरोधातील इंडी आघाडीच्या याचिकेत १४ त्रुटी
'दीपस्तंभ'ची त्या मुलींना साथ, 'भारतीय स्त्री शक्ती'चा मदतीचा हात
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या गुलाम मोहम्मदचे घर जप्त
भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी महिला पत्रकाराला कोपराने धक्का दिला आणि हाताने पकडून खाली पाडल्याचा आरोप केला. संबंधित पत्रकार राहुल गांधी यांना प्रश्न विचारत नव्हत्या, तर केवळ आंदोलनाचे वार्तांकन करत होत्या, असेही भंडारी यांनी म्हटले. भंडारी यांच्या दाव्यानुसार, भाजपच्या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन पत्रकारांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी खांद्याजवळ पकडून जोराने ओढल्यामुळे आपण खाली पडल्याचे संबंधित पत्रकारांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पत्रकाराला मदत केली नाही, असाही आरोप भाजपने केला आहे.

