Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'हनुमान अंश'ची बॉक्स ऑफिसवर १५० कोटींची झेप!

'हनुमान अंश'ची बॉक्स ऑफिसवर १५० कोटींची झेप!

NEWS डंका 1 month ago

११ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार प्रदर्शित

कमी बजेटमध्ये बनलेल्या 'हनुमान अंश' या आध्यात्मिक चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत जबरदस्त यश मिळवले आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या ३२व्या दिवशी भारतात १५० कोटी रुपयांचा ग्रॉस कलेक्शनचा टप्पा पार केला आहे.

चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई आता १५५.६५ कोटी रुपये झाली आहे.

'हनुमान अंश' ने सोमवारच्या दिवशी ९.५० कोटी रुपयांची नेट कमाई केली. त्यामुळे भारतातील नेट कलेक्शन १३१.६३ कोटी रुपये झाले आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला संथ सुरुवात झाल्यानंतर चित्रपटाच्या कमाईत सातत्याने वाढ झाली आणि पाचव्या आठवड्यातही चित्रपटाने दमदार कामगिरी कायम ठेवली. विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अवघ्या २ कोटी रुपयांच्या आसपासच्या बजेटमध्ये झाल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, सकारात्मक चर्चेमुळे प्रेक्षकसंख्या वाढत गेली आणि पुढील आठवड्यांमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली.

दिल्लीतील पीजी दुर्घटनेतील अर्पितच्या डोळ्यांनी दुसऱ्याला मिळणार दृष्टी

ब्रिटनला नेलेले नागा पूर्वजांचे ३९ अवशेष भारतात आणणार

महिला कर्मचाऱ्यांवरील भेदभावाच्या आरोपांमुळे आयफेल टॉवर बंद

दिशा सालियन प्रकरणात सचिन वाझे होणार साक्षीदार?

चित्रपटाची कथा आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित आहे. मुख्य भूमिकेत शोबिनॉ सत्या दिसत असून, चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केले आहे. भारतात १५० कोटींचा टप्पा पार केल्यानंतर आता चित्रपटाची नजर परदेशी बाजारपेठेवर आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी 'हनुमान अंश'चा आंतरराष्ट्रीय स्तरावर रिलीज होणार आहे. होम्बले फिल्म्स परदेशातील वितरणाची जबाबदारी सांभाळणार आहे. त्यामुळे भारतातील दमदार कामगिरीनंतर आता चित्रपट परदेशात किती कमाई करतो, याकडे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka