Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'हिंदूंविरोधात मुस्लिमांना भडकवलं!' ममता बॅनर्जींविरोधात तक्रार

'हिंदूंविरोधात मुस्लिमांना भडकवलं!' ममता बॅनर्जींविरोधात तक्रार

NEWS डंका 3 weeks ago

आमदार जावेद अहमद खान यांच्यावरही आरोप

तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार जावेद अहमद खान यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांनी ममता बॅनर्जी आणि जावेद खान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रगती मैदान पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली असून कुराणातील नियमांचे उल्लंघन, सांप्रदायिक तेढ निर्माण करणारी विधाने आणि नमाजासाठी रेड रोडचा गैरवापर यासंबंधीची आरोप करण्यात आले आहेत.

नाझिया इलाही खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, '२०१२ ते २०२५ या काळात तृणमूलचे आमदार जावेद अहमद खान यांनी रेड रोडवरील नमाज कार्यक्रमाचे राजकीय सभेत रूपांतर केले. त्या वेळी ममता बॅनर्जी यांनी ईदच्या नमाजासाठी जमलेल्या मुस्लिम बांधवांसमोर वारंवार हिंदू धर्माचा अपमान केला, जे कुराण आणि इस्लामच्या तत्त्वांच्या विरोधात आहे.' तक्रारपत्रात पुढे म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांची द्वेषपूर्ण भाषणे, जावेद अहमद खान यांच्या प्रक्षोभक कृती आणि मुस्लिम खिलाफत समितीच्या कथित इस्लामविरोधी आणि कुराणविरोधी कारवायांमुळे संपूर्ण पश्चिम बंगालमधील मुस्लिम समाजाची प्रतिमा मलिन झाली आहे. मी स्वतः इस्लामचे पालन करणारी मुस्लिम असल्याने यामुळे मला मोठा मानसिक त्रास झाला आहे.

सिद्धरामय्या यांनी मुलासाठी मंत्रिमंडळात मागितले स्थान?

आशिया- प्रशांत महासागरावर कोणतेही राष्ट्र वर्चस्व गाजवू शकत नाही!

कर्नाटकात २० लाख बेकायदा बांगलादेशी?

लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यात ११ जण ठार

तक्रारीत असा आरोपही करण्यात आला आहे की, ईदच्या नमाजावेळी ममता बॅनर्जी यांनी प्रत्येक वेळी रेड रोडवरून मुस्लिमांना हिंदूंविरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यंदा बकरी ईदच्या निमित्ताने रेड रोडवर नमाज अदा करण्यात आलेली नाही. पश्चिम बंगाल सरकारने सार्वजनिक रस्त्यांवर नमाज अदा न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यामुळे यावर्षी प्रथमच रेड रोडऐवजी कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंड येथे सामूहिक बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. यापूर्वी मात्र तृणमूल सरकारच्या कार्यकाळात रेड रोडवर नमाज अदा करण्याची परंपरा होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka