Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ईदच्या मिरवणुकीदरम्यान लालबाग-परळमध्ये राडा; दोन गटांत हाणामारी

ईदच्या मिरवणुकीदरम्यान लालबाग-परळमध्ये राडा; दोन गटांत हाणामारी

NEWS डंका 3 weeks ago

पोलिसांकडून गुन्हा दाखल

द-ए-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान मुंबईतील लालबाग-परळ आणि चिंचपोकळी परिसरात दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. भोईवाडा पोलिसांच्या हद्दीत नाकाबंदी सुरू असताना हा प्रकार घडला.

या घटनेत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून, पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, तकिया मशीद परिसरातून काही दुचाकीस्वार मोठ्या आवाजात हॉर्न वाजवत जात होते. यावर स्थानिकांनी आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळाने पुन्हा तणाव निर्माण झाला. दरम्यान, डॉ. बी. ए. रोडवरील परळ वर्कशॉपसमोर रात्री सुमारे ११.४५ वाजता ते मध्यरात्री १२.२० वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. नाकाबंदीच्या वेळी मोठ्या आवाजाचे हॉर्न आणि मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू होती. यावेळी सुमारे ५० ते ६० दुचाकीस्वारांनी काही अंतर पुढे जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण केला. घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर वातावरण अधिक तणावपूर्ण बनले.

यानंतर लक्ष्मी कॉटेज परिसरातील सुमारे ३० ते ४० तरुण रस्त्यावर आले. दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर वादाचे रूपांतर झटापटीत झाले. दोन्ही बाजूंनी झेंड्यांच्या काठ्यांचा वापर करून मारहाण केल्याचा आरोप आहे. काही जण जखमी झाल्याची माहिती असून, जमावाला वेगळं करण्यासाठी गेलेले काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले.

सीमावाद सोडवण्यासाठी भारत- चीनची आठ मुद्द्यांवर सहमती

हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या

नेपाळच्या महापुरामागे भूकंप नव्हे, हिमनदी कोसळल्याचा धक्का!

'टॉक्सिक'ने पहिल्याच दिवशी कमावले १०१ कोटी!

या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी रेहान मसूद सय्यद (१९), आदिल खान अहमद खान (१९) आणि मिराज मोहम्मद फिरोज रईस (१८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय जमावातील इतर अज्ञात व्यक्तींविरोधातही कारवाई सुरू आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या परिसरात शांतता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लालबाग, परळ आणि चिंचपोकळी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka