अपघाताचे कारण अस्पष्ट
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये प्रशिक्षण विमानाचा भीषण अपघात झाला. गंगा नदीच्या काठावरील गंगा बॅरेज परिसरातील शेतात खासगी प्रशिक्षण विमान कोसळल्याने पायलट आणि सहपायलटचा मृत्यू झाला.
ही घटना गुरुवारी घडली.
हे विमान कानपूरस्थित गार्ग एव्हिएशन या विमान प्रशिक्षण संस्थेचं होतं. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही पायलट्सना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत पायलटला ३ हजारांहून अधिक तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता. तो गुजरातचा रहिवासी होता, तर सहपायलट कर्नाटकचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घातला असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ला माहिती देण्यात आली आहे. DGCAचं पथक घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची कारणं तपासणार आहे. याशिवाय, Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडूनही चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हिमनदीचा नैसर्गिक बांध तुटला अन् नेपाळमध्ये महाप्रलय!
नेपाळच्या महापुरात जवळपास ३०० भारतीय पर्यटक बेपत्ता
ईदच्या मिरवणुकीदरम्यान लालबाग-परळमध्ये राडा; दोन गटांत हाणामारी
सीमावाद सोडवण्यासाठी भारत- चीनची आठ मुद्द्यांवर सहमती
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. अपघाताचं कारण तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

