Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स खात्यावरील बंदी कायम!

कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स खात्यावरील बंदी कायम!

NEWS डंका 3 weeks ago

दिल्ली उच्च न्यायालयाने दिला दणका

कॉकरोच जनता पार्टीला (CJP) कायदेशीर दणका मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवार, २९ मे रोजी अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) एक्स खाते तात्काळ पुनर्संचयित (restore) करण्याचे निर्देश देण्यास नकार दिला आहे.

सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केलेली काही सामग्री 'किंचित आक्षेपार्ह' असल्याचे म्हणत, संस्थापक दीपके यांच्या याचिकेवर तात्काळ दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, या मुद्द्यावर सर्वांगीण विचार करणे आवश्यक आहे. सरकार आणि एक्स प्लॅटफॉर्मचे म्हणणे ऐकल्यानंतरच कोणताही आदेश पारित केला जाईल.

न्यायमूर्ती पुरुषिंद्र कुमार कौरव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने, कोणताही आदेश देण्यापूर्वी सरकारचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे आश्वासन केंद्राच्या वकिलांना दिल्याचे वृत्त आहे. अभिजीत दीपके यांच्या वतीने वकील अखिल सिब्बल यांनी बाजू मांडली, ज्यांनी सीजेपीचे एक्स खाते पुनर्संचयित करण्याची मागणी केली. तसेच काही कथित आक्षेपार्ह पोस्ट ब्लॉक राहिल्या तरी हरकत नाही असेही सांगितले. आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ, सिब्बल यांनी यापूर्वीच्या अशा प्रकरणांचा उल्लेख केला ज्यात न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला होता. बार अँड बेंचच्या अहवालानुसार, खंडपीठाने उत्तर देताना म्हटले, 'इतर प्रकरणे आणि हे प्रकरण यात थोडा फरक दिसतो. या प्रकरणात याचे कारण असे दिसते की, संपूर्ण कृतीच मुळात थोडी आक्षेपार्ह आहे.' न्यायालयाने या प्रकरणात तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला असला तरी, सोशल मीडिया खाती ब्लॉक करण्याच्या आदेशांची तपासणी करणाऱ्या केंद्राच्या पुनरावलोकन समितीसमोर दीपके यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली.

प्रकरण काय?

अलीकडे भारतीय तरुण आणि विरोधी पक्षांमध्ये प्रसिद्धी मिळवलेल्या कॉकरोच जनता पार्टीने असा आरोप केला होता की, त्यांचे एक्स (X) वरील सोशल मीडिया हँडल रोखून ठेवण्यात आले होते. अभिजीत दीपके यांनी एक्स अकाउंट उघडल्यावर दिसणाऱ्या पॉप-अपचा स्क्रीनशॉट शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'अपेक्षेप्रमाणेच कॉकरोच जनता पार्टीचे अकाउंट भारतात रोखण्यात आले आहे.' ही घडामोड अशा वेळी घडली, जेव्हा सीजेपी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाली होती आणि इन्स्टाग्रामवर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षालाही मागे टाकले होते.

संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेत बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना मेडल

वादळी पावसामुळे बेतवा नदीवरील बांधकामाधीन पूल कोसळला; ६ मजुरांचा मृत्यू

पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये हातभट्टीच्या विषारी दारुने १३ दगावले

तेलवाहू जहाजाने ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी; ३ जूनला विशाखापट्टणममध्ये पोहचणार

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील काही तरुणांना 'झुरळे' म्हटल्याने वाद निर्माण झाल्यानंतर, हा पक्ष सुरू करण्यात आला होता. तथापि, अनेक लोक, विशेषतः तरुण, लवकरच या संघटनेशी आणि 'झुरळे' या शब्दाशी एकरूप झाले, ज्यामुळे सीजेपीला मोठे बळ मिळाले. एक्सने सीजेपीचे अकाउंट रोखून धरल्यानंतर काही दिवसांनी, अभिजीत दीपके यांनी देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट आणि वेबसाइटबद्दल असेच दावे केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka