Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनासाठी ध्रूव राठी आला भारतात

कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनासाठी ध्रूव राठी आला भारतात

NEWS डंका 2 weeks ago

सीजेपीचे बंगळूरूमध्ये आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बंगळुरूतील फ्रीडम पार्कमध्ये गुरुवारी आंदोलन करण्यात आले. 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी)ने आयोजित केलेल्या या आंदोलनात यूट्युबर ध्रुव राठी आणि अभिनेते प्रकाश राज सहभागी झाले.

'मी इथे सत्तापालटासाठी आलेलो नाही,' असे ध्रुव राठी याने स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी त्याने एसआयआर अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. एसआयआरमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव असल्याचा आरोप करत त्याने हे आंदोलन 'लोकशाही वाचवण्याची लढाई' असल्याचा दावा केला. आंदोलनस्थळी 'एसआयआर रद्द करा', 'ज्ञानेश कुमार गादी सोडा' आणि 'व्होट चोर' अशा घोषणा देण्यात आल्या. सीजेपीने या आंदोलनाला 'जनता न्यायालय' असे नाव दिले. एसआयआर प्रक्रियेमुळे मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याचा दावा करत काही नागरिकांचे अनुभवही आंदोलनात मांडण्यात आले.

अभिनेते प्रकाश राज यांनीही एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. त्यांच्या मते, केवळ ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा या आंदोलनाचा उद्देश नसून एसआयआर प्रक्रियाच रद्द झाली पाहिजे. उपस्थितांना संबोधित करताना, प्रकाश राज यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रियेच्या माध्यमातून संपूर्ण देशाचा अपमान केला आहे. 'या देशात सरकार कोण स्थापन करणार हे जनता ठरवायची, पण एसआयआरमुळे आता सरकार ठरवत आहे की मतदान कोण करणार,' असे राज म्हणाले.

२० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १३ कोटींहून अधिक लोकांना वगळण्यास कारणीभूत ठरलेली एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करताना, हे आंदोलन नागरिकांचे हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी असल्याचे राज यांनी म्हटले. 'या आंदोलनाचा उद्देश केवळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवणे नाही. ते गेले तर त्यांची जागा दुसरे कोणीतरी घेईल. एसआयआर रद्द करणे हा उद्देश आहे,' असे राज म्हणाले. त्यांनी असाही आरोप केला की, कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरून काम करत होते.

दहशतवादाचा 'भस्मासुर' पाकिस्तानलाच भारी पडतोय!

दुष्काळमुक्तीचा वसा! शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर झटले नाना

पडद्यावर सैनिक साकारला, पुढे कारगिलच्या रणभूमीवर केलेली सेवा

अंबानींवर निशाणा साधला; केंद्राने केला खुलासा

सीजेपीकडून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासोबतच एसआयआर प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी, प्रक्रिया स्थगित करणे आणि पूर्वीच्या मतदार याद्या पुनर्स्थापित करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. बंगळुरूनंतर आता १० ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतरवरही आंदोलन करण्याची तयारी सीजेपीकडून करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka