Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
काँग्रेसच्या कर्नाटकात अदानी देतायत नोकऱ्या!

काँग्रेसच्या कर्नाटकात अदानी देतायत नोकऱ्या!

काँग्रेस मुख्यमंत्री डी. शिवकुमार यांची कबुली

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी बेंगळुरूतील सदाशिवनगर येथील मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

यंदा जूनमध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देशातील आघाडीच्या उद्योगपतीने घेतलेली ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना शिवकुमार म्हणाले की, अदानी यांचे अनेक व्यवसाय कर्नाटकात आहेत त्यातून रोजगार कर्नाटकात मिळतात.

मात्र, काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यापूर्वी पंतप्रधान आणि गौतम अदानी यांच्यात व्यावसायिक व्यवहारांबाबत संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री शिवकुमार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर भाजपचे आमदार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. Po

एसबीआयची झेप २०० लाख कोटींकडे! २०३० पर्यंत व्यवसाय दुप्पट करण्याची क्षमता

ट्रम्प यांची शेअर बाजारात कोट्यवधींची उलाढाल

जयपूरमध्ये पाद्रीवर ईडीची छापेमारी; धार्मिक परिवर्तनासाठी निधी वापरला

गौतम अदानी हे बेंगळुरूमधील प्रस्तावित रस्ता बोगदा प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावणारे बोलीदार असल्याने या भेटीने राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने (AEL) या प्रकल्पासाठी २२ हजार २६७ कोटी रुपयांची बोली लावली आहे, तर राज्य सरकारचा या प्रकल्पासाठी अंदाज १७ हजार ६९८ कोटी रुपये होता. म्हणजेच अदानी समूहाची बोली सरकारी अंदाजापेक्षा सुमारे ४ हजार ६०० कोटी रुपयांनी अधिक आहे.

अदानी समूहाची गुंतवणूक

टनेल रोड प्रकल्पाव्यतिरिक्त अदानी समूह मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन, उडुपी औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे व्यवस्थापन, तसेच कर्नाटकमध्ये अक्षय ऊर्जा क्षेत्रातही गुंतवणूक करत आहे.

या भेटीवर प्रतिक्रिया देताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी राहुल गांधींच्या अदानींवरील आरोपांची आठवण करून दिली. ते म्हणाले, 'राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांना भाजपचा एजंट म्हटले होते. पण आता कर्नाटक सरकारने अदानींसाठी रेड कार्पेट अंथरले आहे.'

अशोक यांनी काँग्रेस नेत्यांना प्रश्न विचारला की, 'अदानींना कर्नाटकमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी काँग्रेस नेत्यांनी दिली आहे का?'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka