Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लखनऊमध्ये काँग्रेसच्या कार्यालयात चप्पलफेक, धक्काबुक्की, शिव्यांचा पाऊस

लखनऊमध्ये काँग्रेसच्या कार्यालयात चप्पलफेक, धक्काबुक्की, शिव्यांचा पाऊस

नव्या प्रदेशाध्यक्ष आराधना मिश्रा आणि माजी प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्या कार्यकर्त्यांत वाद

उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या कार्यालयात रविवारी जोरदार गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष आराधना मिश्रा आणि कार्यकारी अध्यक्ष इम्रान मसूद यांच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. या वेळी चप्पलफेक, शिवीगाळ आणि जोरदार धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे. सुमारे दहा मिनिटांहून अधिक काळ हा गोंधळ सुरू होता. माजी प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्याशीही गैरवर्तन झाल्याची माहिती समोर आली आहे.

परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करून संबंधित नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या वृत्तानुसार, पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम सुरू असताना अजय राय यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावर आराधना मिश्रा यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. वाद वाढत गेल्यानंतर कार्यालयात धक्काबुक्की झाली आणि अखेर चप्पलफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसच्या एका महिला नेत्या आणि अजय राय यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचीही चर्चा आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंचे समर्थक आमनेसामने आले आणि परिस्थिती अधिक चिघळली. मात्र, वाद नेमका कशामुळे सुरू झाला आणि संपूर्ण घटनेची जबाबदारी कोणाची होती, याबाबत स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.

मुलीचे कपडे फाडल्याचा व्हीडिओ बनावट…तो होता मुलगा

संपूर्ण दिल्लीतून बॅरिकेड्स हटवा, इंटरनेट आणि मेट्रो स्थानके सुरू ठेवा

सुटका होताच दिपकेची चीडचीड

अजय राय पत्रकार परिषदेला अनुपस्थित

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेला माजी प्रदेशाध्यक्ष अजय राय उपस्थित नव्हते. याबाबत कार्यकारी अध्यक्ष इम्रान मसूद यांना विचारण्यात आले असता, त्यांनी पत्रकार परिषदेत माजी प्रदेशाध्यक्षांनी सहभागी होण्याची परंपरा नसल्याचे सांगितले. पक्षाच्या कार्यालयात त्यांच्याकडून कार्यभार स्वीकारण्यात आल्याचेही मसूद यांनी स्पष्ट केले.

इम्रान मसूद यांनी पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला असून, त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे सांगितले. उत्तर प्रदेशात परिवर्तन घडवून आणणे आणि काँग्रेस संघटना अधिक मजबूत करणे, हे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, इंडिया आघाडीच्या एकजुटीवर त्यांनी भर दिला. आगामी निवडणुका आघाडी मजबूतपणे लढवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka