Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सुटका होताच दिपकेची चीडचीड

सुटका होताच दिपकेची चीडचीड

पंतप्रधान मोदींवर खालच्या भाषेत टीका

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेण्यात आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके याची सशर्त सुटका झाल्यानंतर त्याची चीडचीड पाहायला मिळाली.

नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषेत त्याने टीका केली. सुटकेनंतर केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये दिपके म्हणाला. 'पंतप्रधान म्हणून मोदी भारतासाठी लज्जास्पद आहेत. या देशाने यापूर्वी इतका मोठा भित्रा आणि दादागिरी करणारा नेता कधीच पाहिला नाही.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासाठी दिपके याच्यासह कॉक्रोच जनता पार्टीचे पदाधिकारी सौरव दास आणि आशुतोष रांका दिल्लीला पोहोचले होते. मात्र, शनिवारी दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी या तिघांना विमानातच ताब्यात घेतले. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत विरोधकांनी आक्षेप घेतले आहेत. याच मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

शनिवारी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन जंतर मंतर येथे होणार होते. पण त्याआधीच पोलिसांनी सगळ्यांची धरपकड केली. दिपकेसह त्याच्या तिन्ही सहकाऱ्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले. आज दंडाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

बदलत्या परिस्थितीनुसार भारत-अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप

एलॉन मस्क यांचा मुकेश अंबानींवर पुन्हा निशाणा

ताब्यात घेतल्यानंतर सुमारे २४ तासांनी दिल्लीतील कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी या तिघांची सशर्त सुटका करण्याचे आदेश दिले. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा जामीन भरण्याची आणि पुढील एक वर्ष शांततेचा भंग न करण्याची अट घालण्यात आली.

दरम्यान, दिपके याच्या टीकेवर भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या ट्विटच्या संदर्भात काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे. एसआयआर प्रक्रियेवरून आणि ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यावरून दिपके आणि सहकारी पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka