Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लालबाग परळ भागात जिहादींचा उच्छाद

लालबाग परळ भागात जिहादींचा उच्छाद

NEWS डंका 3 weeks ago

पोलीस आणि स्थानिकांनी बडवले; तिघांना केली अटक

दच्या जुलूस दरम्यान लालबाग परळ परिसरात बुधवारी मध्यरात्री मुस्लिम दुचाकीस्वारांनी उच्छाद मांडला. मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे, मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर आणि रस्त्यावर दुचाकी उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दुचाकीस्वारांनी परिसरात प्रचंड धिंगाणा घातला.

मग पोलिसांनी त्यांना लाठ्यांचा यथेच्छ प्रसाद दिला. या सगळ्या धुडगूसामुळे परिसरातील सर्वसामान्य लोक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. त्यांनीही या उच्छाद करणाऱ्यांना चांगला चोप दिला. त्याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत।

ईदच्या जुलूसमध्ये सहभागी झालेले अनेक तरुण हे बाईकवरून गोंधळ घालत चालले होते. अल्ला हूं अकबरच्या घोषणा दिल्या जात होत्या. एकेका बाईकवर तीन चार लोक बसून आरडाओरडा करत होते, उलट्या बाजूने गाड्या चालवत होते त्यामुळे रहदारीचा पुरता बोऱ्या वाजला. मग पोलिसांनी लाठ्यांनी या धिंगाणा घालणाऱ्याना चोप देऊन पळवून लावले.

त्यावेळी स्थानिक मराठी तरुणही रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या उच्छाद मांडणाऱ्यांना चोप दिला. पोलिसांनि त्यात हस्तक्षेप करत परिस्थिती सावरली आणि गोंधळ घालणाऱ्या काही तरुणांची गचांडी धरली।

संबंधित घटना २६ ऑगस्टच्या रात्री ११.४५ ते २७ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.२० वाजेपर्यंत डॉ. बी. ए. रोडवरील सेंट्रल रेल्वेच्या परळ वर्कशॉपसमोर घडली. भोईवाडा पोलिसांच्या हद्दीत नाकाबंदी सुरू असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात होती. पोलिसांच्या माहितीनुसार, कारवाई सुरू असताना ५० ते ६० दुचाकीस्वार काही अंतर पुढे जाऊन रस्त्यावर थांबले. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. यावेळी घोषणाबाजी सुरू झाल्याने वातावरण चिघळलं. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मी कॉटेज परिसरातील ३० ते ४० मराठी तरुणही रस्त्यावर जमा झाले.

यानंतर दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली आणि काही वेळातच झटापटीला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी झेंड्यांच्या काठ्यांचा वापर करून मारहाण केल्याचा आरोप आहे. परिस्थिती आवरण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही जमावाच्या मारहाणीचा फटका बसला. जमाव आक्रमक होत असल्याचं लक्षात येताच पोलिसांच्या लाठ्या या मुस्लिम तरुणांवर बरसल्या. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.

हिमनदीचा नैसर्गिक बांध तुटला अन् नेपाळमध्ये महाप्रलय!

नेपाळच्या महापुरात जवळपास ३०० भारतीय पर्यटक बेपत्ता

ईदच्या मिरवणुकीदरम्यान लालबाग-परळमध्ये राडा; दोन गटांत हाणामारी

सीमावाद सोडवण्यासाठी भारत- चीनची आठ मुद्द्यांवर सहमती

या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी रेहान मसूद सय्यद (१९), आदिल खान अहमद खान (१९) आणि मिराज मोहम्मद फिरोज रईस (१८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच जमावातील इतर अज्ञात व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.

घटनेनंतर परळ परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे. मात्र, पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka