Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'लष्कर' संस्थापक सदस्य मोहम्मद सरवर पायऱ्यांवरून पडून गतप्राण

'लष्कर' संस्थापक सदस्य मोहम्मद सरवर पायऱ्यांवरून पडून गतप्राण

हाफिज सईदचा होता निकटवर्तीय

पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा (LeT) संस्थापक सदस्य आणि अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेला चौधरी मोहम्मद सरवर याचा लाहोरमध्ये मृत्यू झाला आहे.

अबू हाशिम या नावानेही ओळखला जाणारा सरवर हा लष्करचा प्रमुख हाफिज सईद याचा निकटवर्तीय होता. १८ ऑक्टोबर रोजी लाहोरमधील मरकज कुदसिया येथे पायऱ्यांवरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्वतंत्रपणे स्पष्ट झालेले नाही.

अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने २०१६ मध्ये सरवरला विशेषतः नामनिर्दिष्ट जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. लष्कर-ए-तोयबासाठी निधी उभारणे आणि आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून संघटनेला मदत करणे, यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे अमेरिकी यंत्रणांनी नमूद केले होते.

सरवर हा लष्करच्या पंजाब प्रांताचा प्रमुख म्हणूनही कार्यरत होता. संघटनेच्या 'खिदमत-ए-खल्क' या आर्थिक विभागाचा उपप्रमुख म्हणून त्याने काम पाहिले होते. दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणे, देणग्या मिळवणे आणि संघटनेच्या आर्थिक जाळ्याचे कामकाज सांभाळणे, अशा जबाबदाऱ्या त्याच्याकडे होत्या. पाकिस्तान मार्कझी मुस्लिम लीगचा पंजाबमधील अध्यक्ष म्हणूनही तो कार्यरत होता. या पक्षाचे संबंध हाफिज सईदशी संबंधित जमात-उद-दावाशी असल्याचे वृत्त आहे.

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आरोपींचे धागेदोरे हाती; फडणवीसांची माहिती

प्राध्यापकाकडून कुराण वाचण्याचा, इस्लाम स्वीकारण्याचा हिंदू विद्यार्थिनींना आग्रह

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा

बांगलादेशचे माजी हवाई दलप्रमुख कतारमध्ये अटकेत

सरवरच्या मृत्यूची माहिती पक्षाच्या प्रवक्त्याने दिली. तो नमाज अदा करण्यासाठी जात असताना अचानक कोसळल्याचे प्रवक्त्याने सांगितले; तर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी पायऱ्यांवरून पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त दिले. दरम्यान, लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख सैफुल्ला कसुरी यानेही सरवरच्या मृत्यूची पुष्टी केल्याचे वृत्त आहे. या घटनेमागे अन्य कोणते कारण होते का, याबाबत अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka