Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्राध्यापकाकडून कुराण वाचण्याचा, इस्लाम स्वीकारण्याचा हिंदू विद्यार्थिनींना आग्रह

प्राध्यापकाकडून कुराण वाचण्याचा, इस्लाम स्वीकारण्याचा हिंदू विद्यार्थिनींना आग्रह

सिम्बायोसिस लॉ स्कूलमधील घटना

नागपूर येथील सिम्बायोसिस लॉ स्कूलमध्ये सहाय्यक प्राध्यापक डॉ. अहमर अफाक याच्याविरोधात विद्यार्थिनींना आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचे आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासह कुराण वाचण्याचा आग्रह केल्याचे आरोप समोर आले आहेत.

या प्रकरणाची संस्थेने गंभीर दखल घेतली असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित प्राध्यापकाला रजेवर पाठवण्यात आले आहे. त्याच्या नागपूरमधील तसेच यापूर्वी हैदराबाद येथील कार्यकाळातील तक्रारींचीही चौकशी केली जाणार आहे.

हे प्रकरण एका विद्यार्थिनीने प्राध्यापकाकडून कथितरीत्या पाठवलेले संदेश आपल्या वडिलांना दाखवल्यानंतर समोर आले. त्यानंतर विद्यार्थिनीच्या वडिलांनी विश्व हिंदू परिषद (VHP) च्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. संघटनेच्या प्रतिनिधींनी महाविद्यालय प्रशासनाकडे हा मुद्दा उपस्थित केला आणि नागपूरच्या पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. आरोपांनुसार, प्राध्यापकांनी काही विद्यार्थिनींना अयोग्य आणि लैंगिक आशयाचे संदेश पाठवले. तसेच नमाज अदा करणे, कुराण वाचणे आणि इस्लाम स्वीकारण्याबाबत आग्रह केल्याचा आरोप आहे.

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा

बांगलादेशचे माजी हवाई दलप्रमुख कतारमध्ये अटकेत

इतना सन्नाटा क्यू है? ही आहेत चार कारणं |

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपी शूटरचा फोटो समोर

महाविद्यालयाचे नागपूरमधील संचालक डॉ. सुखविंदर सिंह दरी यांनी संबंधित प्राध्यापकाला चौकशी पूर्ण होईपर्यंत कॅम्पसमध्ये येण्यास आणि शैक्षणिक कामकाजात सहभागी होण्यास मनाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले. उच्चस्तरीय समिती आरोपांची चौकशी करून पुढील कारवाईबाबत शिफारस करणार आहे. प्राध्यापकांच्या हैदराबादमधील पूर्वीच्या कार्यकाळातील कथित गैरवर्तनाच्या आरोपांचाही तपास केला जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka