देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दाखवला आरसा
निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनावरून (एसआयआर) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे.
'लोकशाहीला सचोटीची गरज असते, निवडक संतापाची नाही,' असे म्हणत त्यांनी विरोधकांना आरसा दाखवला आहे. १२४ माजी आयएएस, आयएफएस आणि संलग्न सेवांमधील अधिकाऱ्यांनी नागरिकांना लिहिलेल्या खुल्या पत्रातील मुद्द्यांचा दाखला देत निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास महत्त्वाचा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
माजी सनदी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजाचा बचाव करताना निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षा तपासणी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व आणि देखरेखीच्या नियमांचा उल्लेख केला आहे. अनेक दशकांचा प्रशासकीय अनुभव असलेल्या या अधिकाऱ्यांना निवडणूक यंत्रणेचे कामकाज माहीत असल्याने त्यांच्या भूमिकेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (एसआयआर) विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, 'जेव्हा १२४ अनुभवी आयएएस, आयएफएस आणि संलग्न सेवांमधील अधिकारी निवडणूक आयोगाच्या बचावासाठी पुढे येतात, तेव्हा लक्ष देण्याची वेळ येते. या अनुभवी अधिकाऱ्यांनी अनेक दशके आपल्या निवडणुका चालवल्या आहेत. त्यांनीच सुरक्षा तपासणी, राजकीय पक्षांचे शिक्के आणि देखरेखीचे नियम लागू केले; ही प्रणाली कशी काम करते हे त्यांना माहीत आहे, कारण त्यांनीच ती उभारली आहे.'
पुढे देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या निवडणुकीचा दाखला देत म्हटले आहे की, 'बिहारच्या ऐतिहासिक २०२५ च्या निवडणुकांचेच उदाहरण घ्या: एकही फेरमतदान नाही, ६७.१३% मतदानासह विक्रमी उपस्थिती, जी १९५१ नंतरची सर्वाधिक होती आणि २००३ पासून न बदललेल्या मतदार याद्यांमधून लाखो मृत किंवा दुबार नोंदी काढून टाकणारी एक मोठी मोहीम. एक अस्वच्छ मतदार यादी मतदारांचे संरक्षण करत नाही; ती फसवणुकीला संरक्षण देते. लोकशाहीवरील खरा विश्वास म्हणजे केवळ आपली बाजू जिंकल्यावरच नव्हे, तर प्रक्रियेचा आदर करणे.'
ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
खैबर पख्तूनख्वामध्ये आणीबाणी; इम्रान यांच्या पक्षाचे नेते अटकेत
भेटू नका, न्यायालयात याचिका दाखल करा!
होर्मुझचा तिढा सुटेना! अमेरिकेचा प्रस्ताव इराणने नाकारला
दरम्यान, निवडणूक आयोग आणि एसआयआर प्रक्रियेच्या समर्थनार्थ १२४ माजी आयएएस, आयएफएस आणि संलग्न सेवांमधील अधिकाऱ्यांनीही खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे आरोप करताना विश्वासार्ह पुरावे आवश्यक असल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

