भारताच्या जागतिक भागीदारीचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त अनेक परदेशी राजनयिक आणि दूतावासांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि स्लोव्हाकियाच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भारत आणि संबंधित देशांमधील घनिष्ठ संबंध, मैत्री आणि भागीदारीचाही उल्लेख केला.
भारतातील अमेरिकी दूतावासाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दूतावासाने एक्सवर पोस्ट करत म्हटले, 'राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. येणाऱ्या वर्षात तुम्हाला उत्तम आरोग्य आणि सुख लाभो!'
भारत-जपान भागीदारी आणखी मजबूत होण्याची आशा
भारतातील जपानचे राजदूत ओनो केइची यांनीही पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी 'विकसित भारत'च्या दिशेने देशाचा प्रवास पुढे नेण्यात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. तसेच पुढील वर्षी भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत असताना दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी उंचीवर पोहोचेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे नेतृत्व भारताच्या 'विकसित भारत'च्या दिशेने होणाऱ्या प्रवासाला सतत प्रेरणा देत आहे. पुढील वर्षी राजनैतिक संबंधांचा ७५वा वर्धापनदिन साजरा करत असताना भारत-जपान भागीदारी आणखी मोठ्या उंचीवर पोहोचो,' असे ओनो केइची यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले.
ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा केला उल्लेख
भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांनीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा उल्लेख करत भारत आणि ऑस्ट्रेलियातील संबंधांमधील स्नेह तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांमधील मजबूत संबंध अधोरेखित केले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्याने भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांमधील विलक्षण स्नेह आणि सामर्थ्य तसेच आपल्या लोकांमधील घट्ट नातेसंबंधांचे दर्शन घडवले. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि पुढील वर्ष खूप छान जावो,' असे फिलिप ग्रीन यांनी एक्सवर म्हटले.
स्लोव्हाक राजदूतांनी आठवणींना दिला उजाळा
स्लोव्हाकियाचे भारतातील राजदूत रॉबर्ट मॅक्सियन यांनीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या नुकत्याच झालेल्या स्लोव्हाकिया दौऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला. 'माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद, शक्ती आणि पुढील अनेक यशस्वी वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!' असे मॅक्सियन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
ब्रिटनमध्ये इंग्रजी भाषण गाजल्यानंतर शिंदेंचे गुजरातीत भाषण
युपीआय चालवणे स्वस्त नाही; राहुल गांधींच्या विरोधात ओमर अब्दुल्लांची भूमिका
अमेरिकेच्या निर्बंध विधेयकानंतर भारत ऊर्जा सुरक्षा, आर्थिक हितांवर ठाम
पंतप्रधान मोदींच्या स्लोव्हाकिया भेटीचा उल्लेख करत त्यांनी हा दौरा उल्लेखनीय असल्याचे सांगितले. तसेच या भेटीदरम्यान अनुभवलेला स्नेह, मैत्री आणि अविस्मरणीय क्षण आजही आठवत असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील वर्षे पंतप्रधान मोदी आणि भारतातील जनतेसाठी शांतता, समृद्धी आणि निरंतर प्रगती घेऊन येवोत, अशी शुभेच्छाही त्यांनी दिली.

