संरक्षण, फार्मा अन् तंत्रज्ञानावर भर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांची भेट घेतली. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान झालेल्या या द्विपक्षीय बैठकीत संरक्षण, अर्थव्यवस्था, औषधनिर्माण, विज्ञान-तंत्रज्ञान, संस्कृती आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाली.
दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही विचारांची देवाणघेवाण केली. विशेषतः पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाली. भारत आणि अर्मेनियामधील द्विपक्षीय संबंध आणखी व्यापक आणि मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची भारताची तयारी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं.
भारत आणि अर्मेनियामधील संरक्षण सहकार्य गेल्या काही वर्षांत अधिक महत्त्वाचं ठरलं आहे. या बैठकीत संरक्षण क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवण्याच्या शक्यतांवर चर्चा झाली. व्यापार आणि तंत्रज्ञानासोबत संरक्षण क्षेत्रातील भागीदारी मजबूत करण्यावर दोन्ही देशांचा भर असल्याचं समोर आलं आहे. संरक्षणासोबतच फार्मास्युटिकल्स, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. याशिवाय संस्कृती, शिक्षण आणि दोन्ही देशांतील नागरिकांमधील संपर्क वाढवण्याच्या मुद्द्यांवरही नेत्यांनी चर्चा केली.
काँग्रेस मंत्री बसवराज म्हणतात, हजला जाण्याची इच्छा, पण धर्मांतरित व्हावे लागेल!
दुर्घटनेनंतर चीन - नेपाळ यांच्यात 'तू तू मैं मैं'
इराण-अमेरिका संघर्षाचा बाजाराला फटका; सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात
नेपाळमधील मृतांचा आकडा ८०० पार; ४ हजारांहून अधिक बेपत्ता
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अर्मेनियाने केलेल्या मदतीबद्दल पाशिनयान यांचे आभार मानले. भारत-अर्मेनिया संबंधांमध्ये परस्पर सहकार्य आणि विश्वासाचं हे महत्त्वाचं उदाहरण मानलं जात आहे. या बैठकीमुळे भारत-अर्मेनिया संबंधांना संरक्षणासोबतच अर्थव्यवस्था, औषधनिर्माण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. SCO शिखर परिषदेदरम्यान मोदी यांच्या विविध देशांच्या नेत्यांसोबत होणाऱ्या द्विपक्षीय बैठकांमध्ये ही भेटही महत्त्वाची ठरली आहे.

