भोटेकोशी नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने मोठं संकट निर्माण केलं असतानाच आता पुन्हा एकदा महापुराचा इशारा देण्यात आला आहे. हिमनदी कोसळल्यानंतर आलेल्या महापुरात नेपाळ आणि तिबेटमध्ये मृतांचा आकडा ८०० पार गेला असून, ४ हजारांहून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत.
दरम्यान, भोटेकोशी नदीची पाणीपातळी वाढल्याने प्रशासनाने नव्याने पूराचा इशारा दिला आहे.
नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ७८८ जणांचा मृत्यू झाला असून २,५०२ जण बेपत्ता आहेत. तर चीनच्या अधिकाऱ्यांनी तिबेटमध्ये आणखी १६ जणांचा मृत्यू आणि ५४६ जण बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे नेपाळ आणि तिबेटमधील एकूण मृतांचा आकडा ८०० पेक्षा जास्त झाला आहे.
महापुराच्या तडाख्यातून नेपाळ सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भोटेकोशी नदीची पाणीपातळी पुन्हा वाढू लागली आहे. चीनकडून वरच्या भागात पाण्याचा प्रवाह वाढल्याची माहिती नेपाळला देण्यात आली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुसळधार पाऊस आणि वाढती नदीपातळी यामुळे पुन्हा अचानक पूर येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, चीनच्या अधिकाऱ्यांनी हिमालयीन भागात नवा तलाव तयार झाल्याची माहिती दिली आहे. बुधवारच्या महापुरानंतर पर्वतीय भागातील पाणी मोठ्या प्रमाणात ओसरलं असलं तरी एका भागात सुमारे १४ लाख घनमीटर पाणी साठलेलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. या भागावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं चीनच्या जलस्रोत मंत्रालयाने म्हटलं आहे. त्यामुळे नेपाळमध्ये आणखी एका अचानक पुराचा धोका निर्माण झाला आहे.
इराण-अमेरिका संघर्षाचा बाजाराला फटका; सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात
जॉर्डनमधील दोन अमेरिकी तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले
अंकित बालियान हत्या प्रकरणातील दोन शुटर्स एन्काऊंटरमध्ये ठार
फोनवर बोलताना भरधाव कारने आठ वर्षीय मुलाला चिरडलं
या आपत्तीचा मोठा फटका रासुवा आणि नुवाकोटसह अनेक जिल्ह्यांना बसला आहे. मोठ्या संख्येने मृतदेह सापडल्याने रुग्णालये आणि शवगृहे भरून गेली आहेत. पुरेशा शीतगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने काही मृतदेहांची ओळख पटण्यापूर्वीच तात्पुरती दफनविधी करण्यात येत आहे. मात्र, प्रत्येक मृतदेहाचे डीएनए नमुने आणि ओळख क्रमांक जतन केले जात आहेत, जेणेकरून नंतर कुटुंबीयांना मृतदेह सुपूर्द करता येईल.

