Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नेपाळमध्ये हिमलुंग हिमालवर भीषण हिमस्खलन

नेपाळमध्ये हिमलुंग हिमालवर भीषण हिमस्खलन

NEWS डंका 3 weeks ago

चार मृत, १२ जण बेपत्ता

नेपाळमधील हिमलुंग हिमालच्या बेस कॅम्पवर झालेल्या भीषण हिमस्खलनात मृतांचा आकडा चार वर पोहोचला आहे. हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या १२ जणांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून मोहीम सुरू आहे.

खराब हवामानामुळे बचावकार्याला अडथळे येत असले तरी हवामानात काहीशी सुधारणा झाल्यानंतर शोधमोहीम पुन्हा वेगाने सुरू करण्यात आली आहे.

माउंट हिमलुंगची उंची सुमारे ७,१२६ मीटर असून, हे शिखर नेपाळच्या मनांग जिल्ह्यात आहे. रविवारी बेस कॅम्पवर हिमस्खलन झाले. त्यावेळी तेथे गिर्यारोहण मोहिमांसाठी काम करणारे कर्मचारी आणि मार्गदर्शक उपस्थित होते. हिमस्खलनात तंबू आणि परिसर मोठ्या प्रमाणात बर्फाखाली गेला. आतापर्यंत १० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

नेपाळ नॅशनल माउंटन गाइड असोसिएशनच्या माहितीनुसार, रविवारी दोन मृतदेह सापडले होते. त्यानंतर सोमवारी आणखी दोन मृतदेह शोधण्यात आले. मृतांची ओळख छेबी भोटे, पासांग भोटे, बिरेन्द्र गुरूंग आणि घनश्याम राय अशी करण्यात आली आहे. दोन मृतदेह हेलिकॉप्टरच्या मदतीने काठमांडू येथे आणण्यात आले आहेत. बर्फाखाली अडकलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या १२ जणांचा शोध घेण्यासाठी आठ अनुभवी पर्वत मार्गदर्शकांचे पथक काम करत आहे. हवामानात सुधारणा झाल्यानंतर बचाव पथकांनी बेस कॅम्पपर्यंत पोहोचून बर्फ हटवण्याचे काम सुरू केले. मात्र, परिसरात अजूनही हिमवृष्टी आणि पावसाचा धोका असल्याने बचावकार्य आव्हानात्मक ठरत आहे.

या घटनेतील मृत आणि बेपत्ता असलेले सर्व जण नेपाळी नागरिक असल्याचे वृत्त आहे. शरद ऋतूतील गिर्यारोहणाचा हंगाम सुरू झाल्याने परदेशी गिर्यारोहकांच्या मोहिमांसाठी बेस कॅम्पवर तयारी सुरू होती. त्याचदरम्यान हिमस्खलन झाले. मनांग जिल्ह्यासह नेपाळच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर नेपाळच्या प्रशासनाने गिर्यारोहक आणि पर्यटकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

सचिननंतर विराटची १५ हजारी झेप!

२ हजारांवरील यूपीआय शुल्काला स्थगिती नाही!

कुराशमध्ये पिंकी बल्हाराला कांस्यपदक; उपांत्य फेरीत पराभव

दहशतवादामुळे सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत पाकिस्तान अव्वल

दरम्यान, नेपाळच्या इतर भागांमध्येही अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवार ते रविवार या कालावधीत देशातील विविध भागांत हवामानाशी संबंधित घटनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. हिमलुंग हिमालयावरील बचावमोहीम मात्र अद्याप सुरू असून, बेपत्ता असलेल्या १२ जणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka