Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑडिओ क्लिप ऐकवत षडयंत्र रचल्याचा आरोप

ऑडिओ क्लिप ऐकवत षडयंत्र रचल्याचा आरोप

पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंचा दावा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याविरोधात आणि मराठा आंदोलनाची बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे. गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत त्यांनी काही कथित ऑडिओ क्लिप ऐकवल्या.

या क्लिपमध्ये आपल्याला ५०० कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला.

जरांगे यांनी ऐकवलेल्या एका कथित ध्वनिफितीत एका महिलेचा आवाज असून, त्यात मनोज जरांगे यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, जरांगे यांच्या राजकीय प्रभावाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपमधील नेत्यांनी आणि इतर व्यक्तींनी भूमिका मांडावी, तसेच त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधण्याबाबत चर्चा झाल्याचा दावा आहे. या संभाषणांचा आधार घेत जरांगे यांनी आपल्याविरोधात आणि मराठा आंदोलनाविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला.

याशिवाय, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमधील कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणांवर राजकीय वातावरण निर्माण करण्याबाबत, पालघरमधील वाढवण बंदराला विरोध करणाऱ्यांना विकासविरोधी ठरवण्याबाबत आणि परदेशी शक्ती भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संदेश पसरवण्याबाबतही कथित संभाषणांचा उल्लेख आहे.

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या क्लिपमधील आवाज भाजपचे प्रवक्ते शालिनी, निधी कामदार आणि आमदार अतुल भातखळकर यांचे असल्याचे दिसत असल्याचा दावा म्हस्के यांनी केला. मात्र, हे आवाज खरोखर त्यांचेच आहेत का आणि ऑडिओ क्लिप खरी आहे का, याची सत्यता समोर आली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

राज ठाकरेंएवढ्या कोलांट्या शरद पवारांनीही मारल्या नव्हत्या

जगातील तिसऱ्या सर्वाधिक प्रदूषित शहराच्या स्थानी मुंबई

सौदीतील विमानतळावरील हल्ल्यात भारतीयासह दोघांचा मृत्यू

भारत-पोलंड व्यापार १० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य

ऑडिओ क्लिपमध्ये नेमके कोण आहेत? हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शोधून काढावे. जर त्यांनी याचा छडा लावला नाही तर यात त्यांचा हात आहे, असे मी समजेन, असे मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगे यांनी याआधी दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत ५०० कोटी रुपयांचा मुद्दा उपस्थित केला होता. एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराचे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. आपण कोणाकडून ५०० कोटी रुपये घेतले नाहीत आणि कोणालाही दिले नाहीत, असे त्यांनी सांगितले. जरांगेंनी आरोप करण्यापूर्वी माहितीची पडताळणी करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka