Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सौदीतील विमानतळावरील हल्ल्यात भारतीयासह दोघांचा मृत्यू

सौदीतील विमानतळावरील हल्ल्यात भारतीयासह दोघांचा मृत्यू

हल्ल्यात आठ जण जखमी

सौदी अरेबियातील दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अन्य आठ जण जखमी झाले असून, त्यामध्ये दोन भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

सौदी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय दूतावासाने गुरुवारी या घटनेला दुजोरा दिला.

भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर यासंदर्भात माहिती दिली. सौदी अधिकाऱ्यांनी दम्माम विमानतळावरील हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाल्याचे आणि अन्य दोन भारतीय जखमी झाल्याचे कळवले आहे. घटनेची अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून, प्रभावित कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात येत असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती दूतावासाने संवेदना व्यक्त केल्या असून, जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे.

सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एकूण आठ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये भारत, येमेन आणि बांगलादेशचे प्रत्येकी दोन नागरिक, नेपाळचा एक नागरिक आणि सौदी अरेबियाचा एक नागरिक यांचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

नकारात्मक राजकारणाच्या जोरावर विरोधकांना ३० वर्षे सत्ता मिळणार नाही!

'भाजप सत्तेत असेपर्यंत भारतात पाऊल ठेवणार नाही'

रेहान वाड्राच्या प्रदर्शनातून आंदोलनांचे फोटो हटवले

सुटका होताच सौरव दास, आशुतोष रांकाला क्राईम ब्रँचने बोलावले

दरम्यान, विमानतळावरील नुकसानीचे मूल्यांकन आणि प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना संबंधित सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयाने करण्यात येत आहेत. हल्ल्यानंतर विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले असून, विमान वाहतूक पूर्ववत झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर भारतीय दूतावास सौदी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, मृत आणि जखमी भारतीयांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka