Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाकच्या दहशतवादी हल्ल्यांना जशास तसे उत्तर देणे हाच उपाय!

पाकच्या दहशतवादी हल्ल्यांना जशास तसे उत्तर देणे हाच उपाय!

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांचे वक्तव्य

पाकिस्तान कोणत्याही दहशतवाद्याला खटल्यासाठी भारताकडे पाठवेल, असा विचार करणे ही केवळ 'काल्पनिक गोष्ट' आहे. कायदेशीर प्रक्रिया होत राहतील पण भारतात दहशतवादी पाठवणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी केले आहे.

मनीष तिवारी म्हणाले, २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने स्वतः या दहशतवादी हल्ल्यात त्याचे नागरिक सहभागी असल्याचे मान्य केले होते, तरीही दोषींविरुद्ध कोणतीही कारवाई केली नव्हती. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात लोकांची धर्माच्या आधारावर ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांसमोर त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर ७ ते १० मेदरम्यान भारताने प्रत्युत्तराची कारवाई केली आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. तेथे असलेले दहशतवादाचे जाळे आणि दहशतवादी संघटना नष्ट करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. पण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा मार्ग म्हणजे 'जशास तसे उत्तर देणे' हा आहे. बाकीची कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील.

कॉक्रोच दौडा दौडा भागा भागा सा !

राहुल गांधींचे सोनिया गांधींना 'पेलेट गन' मधून कव्हर फायर

भुलेश्वरला गणेशमूर्ती कोसळली, २ मृत्युमुखी

भारत राजनैतिक माध्यमांद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि पाकिस्तानमध्ये असलेला दहशतवादी हाफिज सईद याला समन्स पाठवण्याच्या तयारीत आहे.

मनीष तिवारी यांनी पुढे सांगितले, 'पाकिस्तानने २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात त्याचे नागरिक सहभागी असल्याचे मान्य केल्यानंतर पाकिस्तानमध्ये जी कारवाई सुरू झाली होती, ती कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे पाकिस्तान कोणत्याही दहशतवाद्याला भारताकडे पाठवेल किंवा त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करेल, अशी अपेक्षा करणे ही केवळ काल्पनिक गोष्ट आहे. मूलभूत गोष्ट अशी आहे की दहशतवादाचा सामना करण्याचा एकच मार्ग आहे. जगातील जेवढे शक्तिशाली देश आहेत, तेही हाच मार्ग स्वीकारतात.'

दरम्यान, २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय तपास संस्थेने डिसेंबर २०२५ मध्ये या प्रकरणात पहिले आरोपपत्र दाखल केले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka