Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आंध्र प्रदेशातील गणेश मंडपांना मोफत वीज

आंध्र प्रदेशातील गणेश मंडपांना मोफत वीज

NEWS डंका 1 month ago

चंद्राबाबू नायडू सरकारची घोषणा

गणेश चतुर्थी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. अशातच आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील गणेश मंडपांसाठी मोठी घोषणा केली आहे.

राज्यभर उभारण्यात येणाऱ्या गणेश मंडपांना मोफत वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री नारा लोकेश यांनी दिली. मंडप समित्यांवर येणारा वीज खर्चाचा आर्थिक भार कमी करणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील सर्व गणेश मंडपांना या मोफत वीज सुविधेचा लाभ मिळावा, यासाठी सरकार आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडपांच्या वीजपुरवठ्यासाठी होणारा खर्च आयोजकांसाठी महत्त्वाचा असतो. सरकारच्या या निर्णयामुळे उत्सवाच्या आयोजनावरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. यंदा तेलुगू पंचांगानुसार १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातील विविध भागांमध्ये गणेश मंडप उभारण्याची आणि उत्सवाची तयारी सुरू आहे.

१३ वर्षांपासून फरार आरोपी हरनेक सिंहचे अमेरिकेतून प्रत्यार्पण

आयफोनचा नवा अवतार! २.९९ लाखांचा फोल्डेबल 'ऍपल ड्युओ'

दुबईचा व्हिडीओ दिल्ली विमानतळाचा म्हणून पसरवला; ६३ खात्यांवर कारवाई

ब्रिक्सच्या व्यासपीठावर मोदी-जिनपिंग भेटणार! गलवाननंतर प्रथमच आमनेसामने चर्चा

नारा लोकेश यांनी गणेशोत्सव भक्तिभावाने, उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे सांगितले. मोफत वीज सुविधेमुळे उत्सवाच्या आयोजनासाठी होणाऱ्या खर्चात मदत होईल, असेही त्यांनी म्हटले. गणेश चतुर्थीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना लोकेश यांनी विघ्नेश्वराच्या आशीर्वादाने प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि आनंद नांदावा, अशी प्रार्थना केली. तसेच राज्यातील नागरिकांना शांती, आरोग्य आणि समृद्धी लाभावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka