सोशल मीडिया पोस्टमध्ये ज्यू हत्यांबाबत चर्चा
फ्लायदुबईच्या विमानातील मुख्य वैमानिक स्मित माछर यांच्यावर चाकूने हल्ला करणारा ओमानी सह-वैमानिक हा जिहादी कट्टरपंथी असल्याचे समोर आले आहे.
ओमानी वैमानिकाच्या सोशल मीडिया खात्यांवर ज्यूंना मारण्यासंदर्भात चर्चा आढळल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्याने केला आहे. या खात्यांवरून संबंधित सह-वैमानिक जिहादी विचारसरणीने प्रभावित होऊन कट्टरपंथी बनल्याचे दिसून येत असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.
इस्रायली अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सह-वैमानिकाच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ज्यूंना मारण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. तसेच तो स्वतःचा जीव देण्यासही तयार असल्याचे त्याच्या ऑनलाइन हालचालींवरून दिसत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
या पार्श्वभूमीवर सह-वैमानिकाचा उद्देश केवळ मुख्य वैमानिकावर हल्ला करण्यापुरता मर्यादित होता की, तो विमान पाडण्याचा प्रयत्न करणार होता, याचाही तपास केला जात आहे. 'कदाचित तो विमान पाडण्याचा प्रयत्न करणार होता,' अशी शक्यता अधिकाऱ्याने व्यक्त केली. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत याबाबत निश्चित निष्कर्ष काढता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. फ्लायदुबईच्या विमानातील या घटनेनंतर सह-वैमानिकाच्या पार्श्वभूमीचा, त्याच्या ऑनलाइन हालचालींचा आणि हल्ल्यामागील संभाव्य हेतूचा तपास सुरू आहे. या तपासातून हल्ल्यामागील नेमके कारण आणि विमानाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा त्याचा उद्देश होता का, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींनी गौरवलेल्या 'मोहम्मद दीपक'ला धमकी प्रकरणी अटक
कलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास अण्वस्त्रांसह पलटवार
तीस्ता नदीवरील १,१७५ कोटींच्या पुल प्रकल्पाला मंजुरी
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात इस्रायल सहभागी होणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. संबंधित सह-वैमानिकाला संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) ताब्यात सोपवले जाईल, अशी इस्रायलची अपेक्षा असून, त्यानंतर होणाऱ्या तपासाचा भाग इस्रायल असेल, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

