Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पीडित कुटुंबीयांच्या अटकेने घाटकोपर अत्याचार प्रकरण तापले

पीडित कुटुंबीयांच्या अटकेने घाटकोपर अत्याचार प्रकरण तापले

NEWS डंका 3 weeks ago

हापौर ऋतू तावडे, किरीट सोमय्या यांचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

मुंबईतील घाटकोपर परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषणाच्या घटनेने वाद पेटला आहे. मुंबईच्या महापौर ऋतु तावडे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या वादाचा केंद्रबिंदू म्हणजे आरोपी फिरोज इक्बाल याच्यासोबतच पीडित कुटुंबियांनाही अटक करण्यात आल्याचा मुद्दा.

आंदोलनादरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, आरोपी फिरोज इक्बालने चार मुलींशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यांपैकी दोन मुलींचे वय केवळ पाच आणि सहा वर्षे आहे. सोमय्या यांनी आरोप केला की सुरुवातीला पोलिस आरोपीला अटक करण्यास तयार नव्हते. ते म्हणाले, 'पीडित कुटुंबांच्या दबावानंतर पोलिसांनी इक्बालला अटक केली, मात्र त्यानंतर आश्चर्यकारक घडामोडीत पोलिसांनी पीडित कुटुंबियांनाच अटक करून तुरुंगात टाकले. या कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आणि आरोपीला मदत करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही.'

महापौर ऋतु तावडे यांनीही या आंदोलनाला ठाम पाठिंबा दर्शवला. पोलिसांनी केलेला दावा—अटक कारवाईदरम्यान जमावाने पोलिसांवर हल्ला केला—हा त्यांनी फेटाळून लावला. महापौर म्हणाल्या की, त्यांच्या कडे असलेले व्हिडिओ पुरावे पोलिसांच्या दाव्याच्या विरुद्ध आहेत. त्या म्हणाल्या, 'मी व्हिडिओ पाहिला आहे, पोलिसांवर कोणताही हल्ला झाला नाही. कुटुंबातील सदस्य फक्त आरोपीवर हल्ला करत होते. अशा घृणास्पद कृत्यानंतर कोणत्याही कुटुंबाचा संताप उफाळून येणे स्वाभाविक आहे. ही प्रतिक्रिया ही कृतीची प्रतिक्रिया आहे. अशा वेळी कुटुंबियांना दिलासा देण्याऐवजी पोलिस त्यांनाच तुरुंगात टाकत आहेत. कुटुंबातील सदस्य अजूनही कोठडीत आहेत.'

दुसरीकडे, पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, आरोपी शेखला अटक करण्यासाठी पोलीस पथक नित्यानंद नगर येथे गेले असता ४०-५० जणांच्या जमावाने सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात जमावाने अधिकाऱ्यांवर हल्ला केला. या चकमकीत एका पोलीस कॉन्स्टेबलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF)च्या एका कर्मचाऱ्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये मुख्य आरोपी फिरोज इक्बाल शेख याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि दंगलीच्या कलमान्वये पीडित पक्षातील काही लोकांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

'भारताला एका सहीवर तेल मिळतं, पाकिस्तानला नाही!'

बदमाशी केलीत, तर कायद्याचा दंडुका… बंगालमधील पोलिस अधिकाऱ्याचा व्हीडिओ व्हायरल

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराच्या घरावर टाकला बॉम्ब

सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या मौलानाचे मुंडण, तोंड काळे

या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून ३०-४० अज्ञात व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. महापौर आणि भाजप नेत्यांच्या तीव्र आंदोलनानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की पीडित कुटुंबियांना तात्काळ मुक्त करण्यात यावे आणि पक्षपाती कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka