Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रशियाकडून भारताला 177S इंजिन, Su-57ची ऑफर

रशियाकडून भारताला 177S इंजिन, Su-57ची ऑफर

NEWS डंका 1 month ago

संरक्षण सहकार्याला नवा वेग

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर भारत आणि रशियामधील संरक्षण सहकार्य आणखी मजबूत होण्याची शक्यता दिसत आहे.

भारताने रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टमच्या आणखी पाच युनिट्सची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताकडे या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीचे एकूण १० स्क्वाड्रन होणार आहेत. यानंतर रशियाने भारतीय हवाई दलासाठी आणखी दोन मोठ्या ऑफर्स दिल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये ५व्या पिढीचे Su-57 लढाऊ विमान आणि अत्यंत शक्तिशाली 177S जेट इंजिन यांचा समावेश आहे.

रशियाने भारतीय हवाई दलाच्या Su-30MKI लढाऊ विमानांच्या ताफ्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी '177S' (Izdeliye 177S) हे प्रगत इंजिन देण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे इंजिन जगातील शक्तिशाली लढाऊ विमान इंजिनपैकी एक असल्याचा दावा केला जात आहे. या इंजिनची थ्रस्ट क्षमता १४.५ टन असल्याचे सांगितले जाते. या इंजिनमुळे भारतीय Su-30MKI लढाऊ विमानाची कामगिरी आणि वेग वाढण्याची शक्यता आहे. दिलेल्या माहितीनुसार, हे इंजिन सध्याच्या AL-31F इंजिनच्या आकाराचेच असल्याने विमानाच्या संरचनेत मोठे बदल न करता ते बसवता येऊ शकते. या इंजिनची सर्व्हिस लाइफ ६,००० तास असल्याचे सांगितले जाते. तसेच, त्याच्या वापरामुळे सुमारे ७ टक्के इंधन बचत होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

गणेशोत्सवात कोकणवारी करणाऱ्यांसाठी खुशखबर! तीन मेमू धावणार

'ब्रिक्स'मध्ये प्रवेशासाठी पाकिस्तानची तीन वर्षांपासून धडपड

सहा वर्षांनंतर ग्वांगझोऊ-नवी दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार

मोदींचा ब्रिक्समधील 'तो' फोटो सांगतोय भारताची कूटनीती!

भारताची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL आधीपासूनच परवान्याअंतर्गत रशियन इंजिनची देखभाल आणि निर्मिती करत आहे. त्यामुळे 177S इंजिनसंदर्भात भारत-रशिया सहकार्य झाल्यास देशाच्या एरोस्पेस क्षेत्राची क्षमता आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, भारत आणि रशियामध्ये ५व्या पिढीच्या Su-57E लढाऊ विमानाबाबतही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka