एस. जयशंकर यांची राजनैतिक कूटनीती
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने मुंबईसह संपूर्ण जगाला दिलेल्या जखमांची आठवण करून देत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील आपली भूमिका पुन्हा ठामपणे मांडली आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेलच्या सुरक्षा प्रमुखांशी भेट घडवून आणली. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हॉटेलमध्ये कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा प्रमुखांनी रुबिओ यांना त्या काळातील घटनांची प्रत्यक्ष माहिती दिली. या भेटीमुळे २६/११ च्या हल्ल्यामागील पाकिस्तानस्थित दहशतवादी नेटवर्कचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
२० ऑक्टोबर रोजी रुबिओ यांनी ताज हॉटेलमधील २६/११ स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सहा अमेरिकी नागरिकांचाही समावेश होता. यावेळी ताज हॉटेलचे सुरक्षा प्रमुख सुनील कुडियाडी यांनी रुबिओ यांना हल्ल्यादरम्यान घडलेल्या घटनांची माहिती दिली. कुडियाडी हे हल्ल्याच्या वेळी हॉटेलमध्ये उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या अनुभवातून रुबिओ यांना त्या भीषण हल्ल्याची प्रत्यक्ष पार्श्वभूमी समजून घेता आली.
२६/११ चा हल्ला हा केवळ भारतावरील दहशतवादी हल्ला नव्हता, तर आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे गंभीर स्वरूप दाखवणारी घटना होती. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी हल्ले केले होते. या पार्श्वभूमीवर रुबिओ यांना हल्ल्याची प्रत्यक्ष माहिती मिळणे महत्त्वाचे मानले जात आहे.
या भेटीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाविरोधात स्वसंरक्षणाचा अधिकार भारत कायम राखतो आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांनीही दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. २६/११ प्रकरणातील आरोपी तहव्वूर राणाच्या भारताकडे प्रत्यार्पणाबद्दलही त्यांनी अमेरिकेच्या प्रशासनाचे आभार मानले.
अल्पवयीन मुलीला थपडा मारणाऱ्या मोहम्मद गुर्फान शेखच्या आवळल्या मुसक्या
हिंदू मंदिरावरील हल्ल्याच्या कटाची 'हेट क्राइम' म्हणून चौकशीची मागणी
३१ डिसेंबर २०२९ पर्यंत भारत नशामुक्त करण्याचे लक्ष्य!
पॅरिसहून परतताच भगवंत मान यांना विमानतळावर तीन तास थांबवले
अमेरिका पाकिस्तानशीही संबंध कायम ठेवत असताना भारतासाठी दहशतवादाचा मुद्दा विशेष महत्त्वाचा ठरतो. अशा वेळी २६/११ च्या हल्ल्याच्या प्रत्यक्ष साक्षीदाराकडून माहिती मिळणे, तसेच हल्ल्यातील अमेरिकी नागरिकांच्या मृत्यूची आठवण करून देणे, याला राजनैतिक महत्त्व आहे. ताज हॉटेलमधील ही भेट केवळ श्रद्धांजलीपुरती मर्यादित न राहता दहशतवादाविरोधातील भारताच्या ठाम भूमिकेची आठवण करून देणारा राजनैतिक प्रसंग ठरली.

