Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
S-400 खरेदीसाठी रशियासोबत ५० हजार कोटींची डील?

S-400 खरेदीसाठी रशियासोबत ५० हजार कोटींची डील?

NEWS डंका 1 month ago

रशियाने भारताला पाठवला खर्चाचा प्रस्ताव

भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान S-400 हवाई संरक्षण प्रणालीने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेनंतर भारताने आणखी पाच S-400 प्रणाली खरेदी करण्याची प्रक्रिया पुढे नेली आहे.

रशियाने या खरेदीसाठी भारताला खर्चाचा सविस्तर प्रस्ताव पाठवला असून, आता दोन्ही देशांमध्ये किंमतीबाबतची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

रशियाने भारताच्या निविदेला प्रतिसाद देताना बिल ऑफ क्वांटिटीज (BOQ) प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावात प्रणाली उभारण्यासाठी आवश्यक बांधकाम आणि साहित्याचा खर्च नमूद करण्यात आला आहे. या आधारे भारत आणि रशियामध्ये खर्च निश्चित करण्यासाठी वाटाघाटी होणार आहेत. या प्रस्तावित कराराची किंमत ५० हजार कोटी रुपयांहून अधिक असण्याचा अंदाज आहे. करार अंतिम करण्यापूर्वी किंमत निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीसमोर (CCS) मंजुरीसाठी ठेवला जाईल.

नेपाळमधील महाप्रलयातील मृतांचा आकडा १,३४४ वर

सहारनपूरमध्ये अनधिकृत मशिदीवर बुलडोझर

ना सिमेंट, ना काँक्रीट… सिंधू नदीवर भारताने उभारला पहिला 'रॉक डॅम'

इराणच्या 'पिकॅक्स माउंटन' अणुस्थळावर अमेरिकेकडून हल्ल्याचा इशारा

भारताने यापूर्वी रशियासोबत पाच S-400 प्रणालींचा करार केला होता. या प्रणालींची भारतातील तैनाती टप्प्याटप्प्याने करण्यात आली. आता आणखी पाच प्रणाली मिळाल्यास भारताच्या दीर्घ पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई संरक्षण व्यवस्थेने पाकिस्तानकडून आलेल्या हवाई धोक्यांचा सामना केला. या कारवाईत S-400 प्रणालीच्या कामगिरीने भारताच्या संरक्षण नियोजनात तिचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतरच आणखी पाच S-400 प्रणाली घेण्याच्या प्रस्तावाला वेग आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka