Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंविरोधात गुन्हा

शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंविरोधात गुन्हा

मुंबई पोलिसांकडून कारवाई

मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनाप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

शिवाजी पार्क येथे काल झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या कारवाईला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर दोन्ही नेते स्वतः आंदोलनात सहभागी झाले. या घडामोडींनंतर पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

एमपीएससी चौकशीसाठी समिती; तुकाराम मुंढेंकडे महत्त्वाची जबाबदारी

'लोकशाहीला सचोटीची गरज, निवडक संतापाची नाही'

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

खैबर पख्तूनख्वामध्ये आणीबाणी; इम्रान यांच्या पक्षाचे नेते अटकेत

माहितीनुसार, रविवार (११ ऑक्टोबर) रोजी शिवाजी पार्क परिसरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात होते. मात्र या आंदोलनाची परवानगी नसून तणावाचे वातावरण पाहता आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे, परवानगी नसताना आंदोलन करणे, या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून ठाकरे बंधूसोबत असलेल्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka