Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
स्मित माछर यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार जाहीर

स्मित माछर यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार जाहीर

NEWS डंका 2 weeks ago

स्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी केली घोषणा

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात सहवैमानिकाने केलेल्या हल्ल्यानंतरही प्रसंगावधान राखत १७४ प्रवाशांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित माछर यांचा इस्रायलकडून सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी गुरुवारी यासंदर्भातील घोषणा केली. गंभीर जखमी अवस्थेतही दाखवलेले धैर्य आणि व्यावसायिक कौशल्य यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे त्यांनी म्हटले आहे.

स्मित माछर यांना इस्रायलचा 'प्रेसिडेन्शियल अवॉर्ड फॉर सिव्हिलियन हिरॉइझम' हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर स्वतः त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल, असे राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी स्पष्ट केले. या घटनेत माछर यांच्यासोबतच हल्लेखोराला रोखण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या इस्रायली प्रवाशांचाही गौरव करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा नकाशा बदलणार? चार प्रांतांच्या विभाजनाचा प्रस्ताव

'मेड इन इंडिया' खेळण्यांचा जगभरात डंका

'पत्रकार परिषदेत आरोप नको, न्यायालयात पुरावे द्या'

सेन्सेक्स १,०४२ अंकांनी कोसळला

३० सप्टेंबर रोजी फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानात ही घटना घडली. दुबईहून तेल अवीवच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या या विमानात १७४ प्रवासी होते. विमान प्रवासात असताना सहवैमानिकाने कॅप्टन स्मित माछर यांच्यावर कुऱ्हाडीसदृश धारदार हत्याराने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात माछर गंभीर जखमी झाले. त्याचवेळी विमान अवघ्या ३० सेकंदांत सुमारे १४ हजार फूट खाली आले. गंभीर जखमी अवस्थेतही माछर यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यामुळे प्रवासी आणि विमानातील कर्मचाऱ्यांना आत प्रवेश करून हल्लेखोराला रोखता आले. विमानातील अन्य दोन वैमानिकांनी नियंत्रणाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर विमानाचे सौदी अरेबियातील तबूक येथे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेत सर्व १७४ प्रवाशांचे प्राण वाचले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka