२४ ऑक्टोबरला होणार सोहळा
विशेष मुलांसाठी आई डे केअरच्या माध्यमातून गेली १५ वर्षे अथक परिश्रम घेत असलेल्या स्वाती मोहिते यांना यंदाचा १७वा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर झाला आहे. २४ ऑक्टोबरला बोरिवली पश्चिम येथील अटल स्मृती उद्यान येथे सायंकाळी ४ ते ६ या दरम्यान या पुरस्कारांचे वितरण होईल.

तंत्रज्ञ, लेखक, उद्योगरत्न व समाजसेवक अच्युत गोडबोले हे या सोहळयाचे प्रमुख पाहुणे असतील. भाजपाचे कांदिवली पूर्व येथील आमदार अतुल भातखळकर हे या कार्यक्रमात विशेष अतिथी असतील. केशवसृष्टीचे अध्यक्ष व निमंत्रक डॉ. सतीश मोढ यांनी स्वाती मोहिते यांच्या या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
'स्कूल ठीक करो' अभियानामुळे फ्रान्समध्ये पेटला वणवा…
अराजकवाद्यांमुळे फ्रान्स, इटलीत वणवा
सरकारी गृह कर्ज महागल्याने ग्राहकांना झटका
सप्टेंबरमध्ये २.०४ लाख कोटींचा महसूल जमा, महाराष्ट्राची आघाडी कायम
स्वाती मोहिते या समाजातील विशेष मुलांच्या विकासासाठी गेल्या १५ वर्षापासून पेण येथे निवासी प्रकल्प चालवीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आई डे केयर या संस्थेने आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कौशल्य विकासाची संधी देऊन त्यांना स्वावलंबी जीवनासाठी दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

