Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तरुण पिढी भरकटलेली नाही, आहे संवादाची गरज

तरुण पिढी भरकटलेली नाही, आहे संवादाची गरज

NEWS डंका 1 month ago

रसंघचालक मोहन भागवत यांचे महत्त्वाचे विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजची तरुण पिढी भरकटलेली किंवा दिशाहीन नसल्याचे सांगत, त्यांना समजून घेण्यासाठी 'आदेश नव्हे, संवाद' आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर दिल्लीत सुरू असलेल्या मोठ्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

'विश्व मंगल्य सभा' कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी पिढ्यांमधील वाढत्या दरीवर भाष्य केले. आजच्या तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगताना ते म्हणाले, 'आम्ही तरुण होतो तेव्हा आज्ञा पाळण्याचा काळ होता. आता परिस्थिती तशी राहिलेली नाही.'

आजच्या तरुणांबद्दल मोहन भागवत काय म्हणाले?

भागवत म्हणाले की, आजची तरुण पिढी प्रश्न विचारण्यास अधिक प्रवृत्त आहे. त्यामुळे पालक आणि ज्येष्ठांनी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कुटुंबांमध्ये संवादासाठीचे वातावरण कमी होत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

'नवी पिढी प्रश्न विचारते. त्यांना प्रत्येक गोष्टीमागचे कारण समजावून सांगावे लागते. त्यांना भरपूर प्रेम द्यावे लागते. त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागतो. त्यांच्याशी सातत्याने संवाद साधला पाहिजे,' असे भागवत म्हणाले.

तरुणांचा विश्वास जिंकण्यासाठी आदेश नव्हे तर संवाद आणि सहमती महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. 'नव्या पिढीला आपलेपणाची भावना द्यावी लागेल. त्यांच्याशी संवाद हवा. आदेश नव्हे, चर्चा हवी. हुकूम नव्हे, तर सहमती हवी,' असे ते म्हणाले.

'गर्वाने निरोप घेतोय'!

'तिरंग्याचा मान उंचवा!'; भारतीय चमूला मोदींचा विजयमंत्र

भारताची अनाहत पुन्हा चमकली!

विद्यार्थी आंदोलनाचा थेट उल्लेख नाही

भागवत यांनी जंतर-मंतरवरील सुरू असलेल्या आंदोलनाचा थेट उल्लेख केला नसला, तरी त्यांच्या वक्तव्याची वेळ पाहता त्याचा संदर्भ सध्याच्या परिस्थितीशी जोडला जात आहे.

आतापर्यंत त्यांनी कोक्रॉच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर थेट भाष्य केलेले नाही. हे आंदोलन आता दिल्लीबरोबरच इतर राज्यांतही पसरले आहे.

२० जुलै रोजी संसद परिसरालगत आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर जनतेतील संताप आणखी वाढला आहे.

आंदोलनाची प्रमुख मागणी

आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे NEET-UG प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.

मात्र, केंद्र सरकारने ही मागणी फेटाळून लावली आहे. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हस्तक्षेप करत, प्रश्नपत्रिका फुटी आणि शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी नवीन विधेयक आणण्याची घोषणा केली आहे.

तथापि, आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कोक्रॉच जनता पार्टीने सरकारसोबत दोन फेऱ्यांच्या चर्चेनंतरही आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवली असून आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka