Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कॉक्रोच फ्लॉप. दिल्ली पोलिसांनी दिपके, नेहा बोराची गठडी वळली

कॉक्रोच फ्लॉप. दिल्ली पोलिसांनी दिपके, नेहा बोराची गठडी वळली

कनॉट प्लेसमध्ये तिरंगा रॅली काढण्यास विरोध

कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस येथे तिरंगा लहरा दो नावाने काढण्यात येणारी रॅलीची योजना सपशेल फ्लॉप ठरली. या रॅलीसाठी दिल्लीत ठाण मांडलेल्या अभिजीत दिपकेला दिल्ली पोलिसांनी तिरंगा मार्चच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेतले.

डाव्या विद्यार्थी संघटनेची प्रमुख नेहा बोरा हिलादेखील दिल्ली पोलिसांनी रस्त्यावर उतरलेली असताना ताब्यात घेऊन तिला आंदोलनस्थळापासून दूर नेले. आंदोलनस्थळी पोलिसांनी १५० लोकांना ताब्यात घेतले.

आशुतोष रांका, सौरव दास या कॉक्रोच पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कोठडीत डांबण्यात आल्यानंतर अभिजित दिपके याने १६ ऑक्टोबर रोजी कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क येथे तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. पण पोलिसांनी सकाळीच त्याच्या तिथे राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याला रॅली न काढण्याची विनंती केली. पण दिपके संध्याकाळी रॅलीसाठी बाहेर पडल्यावर त्याला पोलिसांनी अडवले आणि गाडीत टाकून नेले.

दिल्ली पोलिसांनी दिपके याला मार्च आयोजित न करण्याची नोटीस बजावली होती. तसेच, परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन केले. सेंट्रल पार्क शुक्रवार आणि शनिवारी प्रशासकीय कारणास्तव बंद ठेवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

तिरंगा यात्रेपूर्वी अभिजित दिपकेला नोटीस

'निवडणूक सुधारणांचा नव्हे, सत्ता बळकावण्याचा कट'

डोंगराळे चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणी नराधम विजय खैरनारला फाशी!

'दहा वेळा सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो'

यासंदर्भात कॉक्रोच जनता पार्टीने म्हटले की, एका अभिजितला ताब्यात घेतले तर एक हजार अभिजित तयार होतील तर कॉक्रोचच्या समर्थनासाठी भारतात आलेल्या ध्रूव राठीनेही पोस्ट करत रॅलीचे समर्थन केले तसेच मोदी सरकार तिरंग्याचा तिरस्कार करतात असा आरोप केला. तामिळनाडूच्या डीएमके पक्षाचे माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही कॉक्रोचचे नेते दिपके, डाव्या विद्यार्थी संघटनेची प्रमुख नेहा बोरा यांची चिंता वाटत असल्याचे म्हटले.

मला फाशी द्या!

दिपकेला नोटीस बजावण्यासाठी पोलिस त्याच्या घरी गेले तेव्हा पाठीवर तिरंगा घेऊन बसलेला दिपके संतापला. तो पोलिस अधिकाऱ्याला म्हणू लागला की, 'हे तुम्ही लोकांनी काय चालवलंय? हा काय विनोद आहे? ही कसली नोटीस आहे? याला नोटीस म्हणतात का? तुमच्या मनात येईल ते तुम्ही लिहून नेत आहात.'

महात्मा गांधींचे छायाचित्र असलेला पांढरा टीशर्ट आणि निळी जीन्स परिधान केलेला अभिजीत दिपके समोर बसलेल्या पोलिस अधिकाऱ्याला हे सवाल करताना व्हीडिओत दिसत होते. यानंतर दिपके पोलिसांना आव्हान देत म्हणाला की, 'फाशीवर चढवा ना. काय विनोद आहे हा?' तसेच, आपण हिंसाचाराला चिथावणी देत असल्याचा एक तरी व्हिडिओ दाखवावा, असे आव्हानही त्यांनी पोलिसांना दिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka