Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उद्धव ठाकरे रविवारी दादरच्या हनुमान मंदिरासमोर म्हणणार 'रामरक्षा'

उद्धव ठाकरे रविवारी दादरच्या हनुमान मंदिरासमोर म्हणणार 'रामरक्षा'

राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावरून राज्यभर करणार महाआरती

हाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नऊपैकी सहा खासदार पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभर मोठ्या आध्यात्मिक आणि जनसंपर्क अभियानाची आखणी केली आहे.

पक्षाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील प्रमुख राम आणि हनुमान मंदिरांमध्ये 'रामरक्षा महाआरती' आयोजित करण्यात येणार आहे.

दादरमधून अभियानाची सुरुवात

या राज्यव्यापी धार्मिक आणि सांस्कृतिक अभियानाची सुरुवात मुंबईतील दादर परिसरातून होणार आहे. पक्षाकडून या उपक्रमाचा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू करण्यात आला आहे.

या अभियानातील पहिली रामरक्षा महाआरती दादर (पश्चिम) येथील एन. सी. केळकर मार्गावरील पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिरात होणार आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आज भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे; पण भारतीय जनता पक्षाचे मूळ जे आहे, ते ज्या आंदोलनातून उभे राहिले, त्यात देशातील तमाम हिंदू सहभागी होता. तो काळ आजही आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. आपल्या माध्यमातून ती सारी दृश्ये जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहेत. कारसेवकांवर झालेले अत्याचार, गोध्राचे हत्याकांड, अहमदाबादमधली दंगल आणि अगदी मुंबईमध्ये सुद्धा जे काही घडले होते, त्याच्यामध्ये हिंदूंनी बरंच काही सोसलं होतं. त्या सगळ्यावर मी असं म्हणेन की, भांडवल करून भारतीय जनता पक्ष जो हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी संपूर्ण देशामध्ये त्याचे फक्त दोनच खासदार होते आणि 'गांधीवादी समाजवाद' हा त्यांनी अंगी कारलेला एक कार्यक्रम होता, तो कार्यक्रम सोडून ते हिंदुत्वाकडे वळले.

बिसूरमध्ये मशिदीशेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबांना प्रचंड त्रास

राष्ट्रवादी बंगाली तरुणांना हाक, लवकरच २.५ लाख युवक होणार संघस्वयंसेवक

मुंबईसह अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट, एनडीआरएफची पथके सज्ज

मॅनहोल मृत्यूप्रकरणी कंत्राटदार, कर्मचाऱ्यांवर गुन्हा, चार अधिकारी निलंबित

ते पुढे म्हणाले की, मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा. जे जे मंदिर लुटत आहेत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो आहोत. येत्या रविवारी पाच तारखेला दादर येथे हनुमान मंदिरासमोर तमाम हिंदूंना मी आमंत्रित करत आहे. पक्ष वगैरे न बघता, जे जे हिंदू आहेत, ज्यांना ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, त्यांनी एकत्र यावे. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील आणि मी तर म्हणेन केवळ शिवसैनिकच नाही, तर ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलेले नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते सगळे हिंदू यात येऊ शकतील, त्यांनी यावे. तिथे मग आम्ही 'रामरक्षा' आंदोलन करतो आहोत. आम्ही तिथे रामरक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा सुद्धा म्हणू.

राज्यभर होणार महाआरती

दादरमधील पहिल्या कार्यक्रमानंतर हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हे, तालुके आणि प्रमुख शहरांतील राम व हनुमान मंदिरांमध्ये टप्प्याटप्प्याने रामरक्षा महाआरती आयोजित करण्याची पक्षाची योजना आहे. या माध्यमातून पक्ष कार्यकर्ते आणि जनतेला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पार्श्वभूमी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये सत्ता गमावल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा निवडणुकीत ९ जागा जिंकल्या होत्या. मात्र, २०२६ मध्ये पक्षाचे सहा खासदार बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले.

या घडामोडीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत जाऊन लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka