Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विद्यार्थ्यांवर AK-47 मधून गोळीबार करणारा जवान निलंबित

विद्यार्थ्यांवर AK-47 मधून गोळीबार करणारा जवान निलंबित

NEWS डंका 0 months ago

सीवान गोळीबार प्रकरणात कारवाई

बिहारमधील सीवान येथे नीट (NEET) प्रश्नफुटी प्रकरणाविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर AK-47 रायफलमधून गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या पोलिस जवानाला अखेर निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

२५ जुलै रोजी बिहार बंददरम्यान सीवानमध्ये विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कारवाई केली. याच वेळी एका पोलिस जवानाने AK-47 रायफलमधून गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आला. या घटनेत तीन विद्यार्थी गोळीबारात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जखमी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी किमान एका विद्यार्थ्याला पोलिसांच्या गोळीचा फटका बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित दोन विद्यार्थ्यांना नेमकी कशी दुखापत झाली, याचाही तपास सुरू आहे. मात्र, जखमी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचा दावा आहे की तिन्ही विद्यार्थ्यांना पोलिसांच्या गोळीबारातच जखमा झाल्या.

या प्रकरणावरून बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ शेअर करत, विद्यार्थ्यांवर थेट AK-47 मधून गोळीबार झाल्याचा आरोप केला आणि या घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार धरले.

सोन्या-चांदीला पुन्हा झळाळी; तणाव ओसरताच दर तेजीत

त्या अभिनेत्रीने दाखवले मोदींचे अश्लील पोस्टर; गुन्हा दाखल

'कोक्रॉच' आंदोलनानंतर झाला ६० मेट्रिक टन कचरा

आयटीचा 'पॉवर प्ले'! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात तेजी

दरम्यान, पोलिसांनी आंदोलनादरम्यान दगडफेक, तोडफोड आणि हिंसाचार झाल्याचे सांगितले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूराचा वापर आणि मर्यादित बळाचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून गोळीबाराची नेमकी परिस्थिती, जवानाची भूमिका आणि जखमी विद्यार्थ्यांना गोळ्या कशा लागल्या, याचा तपास वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka