Dailyhunt
अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक.

अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक.

मुंबई : हरियाणा पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत बिश्णोई गँगचा गुंड सुक्खा कालुया याला पानिपतमधून ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई शहर पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

सुक्खा कालुया याने सलमान खानची सुपारी घेतली होती. त्याने सलमान खानच्या घराची रेकीदेखील केली.

अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घरावर पहाटेच्या सुमारास एप्रिल महिन्यात गोळीबार झाला होता. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर सुक्खा हा फरार झाला होता. आता, मु्ंबई पोलिसांकडून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास सुरू असताना सुक्खाला अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. नवी मु्ंबई पोलिसांनी देखील बिश्नोई गँगशी संबंधितांना अटक केली होती. त्यांच्या जबाबातून वांद्रे आणि पनवेलमधील फार्म हाऊस परिसराची रेकी करण्यात आली होती. सलमान खानच्या हत्येचा कट आखण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास करण्यात येत आहे. बाबा सिद्दिकी हे राजकीय नेते असले तरी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत त्यांचे संबंध होते. सलमान खान हा त्यांचा निकटवर्तीय समजला जातो. बाबा सिद्दिकी यांची शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी हत्या झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे अटकेत; चौकशीत धक्कादायक खुलासा…

सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करुन गेले वांद्रे रेल्वे स्टेशनवर; ओळख पटली…

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर…

बाबा सिद्दिकी! API राजेंद्र दाभाडे यांनी जीवाची बाजी लावून पकडले आरोपी…

The post अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka