Dailyhunt
अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची किरकोळ कारणावरून हत्या.

अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची किरकोळ कारणावरून हत्या.

वी दिल्ली: प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची किरकोळ कारणावरून हत्या झाली आहे. निजामुद्दीनमध्ये पार्किंगवरून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

निजामुद्दीन पोलिस स्टेशन परिसरातील जंगपुरा भोगल बाजार लेनमध्ये गुरुवारी (ता. ७) रात्री उशिरा पार्किंगचा वाद झाला. रात्री उशिरा 11 वाजताच्या सुमारास, गेटवरून स्कूटी काढून बाजूला पार्क करण्यावरून झालेल्या वादात आरोपीने आसिफ कुरेशी याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आसिफ कुरेशी गंभीर जखमी झाला. त्याला असिफला रुग्णालयात नेण्यात आले. पण. डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले. आरोपीने किरकोळ कारणावरून क्रूरपणे गुन्हा केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मृताच्या पत्नीने सांगितले की, यापूर्वीही पार्किंगच्या वादावरून त्याचे माझ्या पतीशी भांडण झाले होते. माझे पती कामावरून घरी परतले तेव्हा शेजारच्या घरासमोर त्याची स्कूटी उभी होते. शेजाऱ्याला काढण्यास सांगितले असता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि धारदार शस्त्राने त्याची हत्या केली.

प्रसिद्ध अभिनेता हॉटेल रुममध्ये आढळला मृतावस्थेत…

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या व्हिडीओने उडवली एकच खळबळ…

अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने 57व्या मजल्यावरून मारली उडी…

अभिनेता तुषार घाडीगावकार याने काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल…

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

The post अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची किरकोळ कारणावरून हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka