Dailyhunt
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या व्हिडीओने उडवली एकच खळबळ.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या व्हिडीओने उडवली एकच खळबळ.

मुंबई : #MeToo प्रकरणामुळे चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या लेटेस्ट व्हिडीओने एकच खळबळ उडवली. तिला स्वत:च्याच घरात त्रास दिला जात असल्याचे सांगत एक व्हिडीओ शेअर केला.

या व्हिडीओमध्ये ती ढसाढसा रडताना दिसतेय. या व्हिडीओनंतर तनुश्रीने माध्यमांशी बोलताना करताना तिच्या आरोपांना सिक्वेलच सादर केला. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. 2018 साली तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर #MeToo प्रकरणी आरोप केले होते.

तनुश्री दत्ता म्हणाली, "व्हिडीओ म्हणजे 4-5 वर्षांचा राग, फस्ट्रेशन एकत्र बाहेर आलं. मागच्या काही वर्षात इतक्या वाईट आणि विचित्र घटना घडल्या आहे. 2020 पासून आलेल्या फिल्म प्रोजेक्ट साबोटाइज करण्यात आले. माझी छोटी मोठी कामं काढून घेण्यात आलीत. माझे ई मेल, व्हाट्स अँप, फोन नंबर हॅक करण्यात आले. एक ग्रुप आहे. ते मिळून मला त्रास देत आहेत. माझ्याविषयी लोकांच्या मनात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. 2020 मध्ये मी उज्जेनला गेले होते. माझ्या घरात एक बाई ठेवली होती. जी माझ्या खाण्या पिण्यात अशा काही गोष्टी घालायची ज्यामुळे मी आजारी पडायचे. 12-16 तास मला शुद्ध नसायची. तिथे माझा अपघात झाला होता. माझ्या ऑटोचे ब्रेक कोणी कापले होते. असे दोन वेळा झाले. माझी तब्येत 2-3 महिने ठीक नव्हती. मला समजलं की माझा पिच्छा केला जात आहे. मला फॉलो केलं जात आहे. माझ्या घराची चावी कोणाकडे होती. माझ्या घरातील सामान इकडे तिकडे केलं जात होतं. माझ्या घरात घुसून माझ्या खाण्यात काही मिक्स केले जात होते."

'माफीया गँगमध्ये कोण कोण आहेत हे मी स्पेसिफिक सांगू शकत नाही. अभिनेता सुशांत सिंहराजपूतबरोबर जे जे होत होतं ते सगळं माझ्याबरोबर होतंय. फरक फक्त एवढाच आहे की तो या जगात नाही. मी या जगात आहे. कारण मी सुशांतच्या केसचा अभ्यास केला होता. पूजा मिश्रा नावाची एक मुलगी आहे तिलाही पागल बनवलं आहे पण तिच्या बोलण्यात दम आहे. तिला देखील त्रास देण्यात येतोय. माझ्याबरोबरही तेच होतंय पण मी माझं संतुलन ढासळू दिलं नाही. कारण मी कृष्ण भक्त आणि शिव भक्त आहे. मी त्यांना माझा सारखी बनवलं. माझ्या आजूबाजूला महाभारत होत आहे. मला फक्त सरळ चालायचं आहे आणि स्थिर राहायचं आहे."

"मी तक्रार केली पण झालं काय, इथे मराठी माणूस मराठी माणूस करून आऊटसाइडर्स मेला तरी एक मराठी माणूस क्रिमिनल जरी असला तरी त्याला पोलिसांचा सपोर्ट मिळतो. स्वाभाविक बाब आहे. असं व्हायला नको. मंत्री देखील त्यांना सपोर्ट करतात त्यामुळे त्यांची हिंमत वाढते. मग त्यांचा इगो वाढतो. मग त्याच्या मनात आलं असणार की हिला मी इंगा दाखवतो. हिला त्रास देऊन देऊन मी हिला संपवून टाकेन", असेही तनुश्री म्हणाली.

अभिनेत्रीच्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर चोरी…

ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनचं उत्तर; मी पुन्हा लग्न करतोय…

अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने 57व्या मजल्यावरून मारली उडी…

संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली…

अभिनेता तुषार घाडीगावकार याने काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल…

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

The post अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या व्हिडीओने उडवली एकच खळबळ… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka