Dailyhunt
अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांची आत्महत्या.

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांची आत्महत्या.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांनी वांद्रे येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेले नाही. बांद्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

आलमेडा पार्क इथल्या इमारतीच्या ६व्या मजल्यावरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली.

मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी आज (बुधवार) सकाळी आत्महत्या केली. सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. बांद्र्यातील घरात ही घटना घडली. आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. अनिल अरोरा यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मलायकाचा घटस्फोटीत पती अरबाज खान कुटुंबियांसह बांद्र्यातील घरी पोहोचला आहे. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मलायका अरोरा सध्या मुंबईत नसून ती कामानिमित्त पुण्याला गेली होती. ती पुण्याहून मुंबईला रवाना झाली आहे. अनिल अरोरा यांचा मृतदेह बांद्र्यातील बाबा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब भारताच्या सीमेवर वसलेल्या फाजिल्का येथील रहिवासी होते. अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते. अनिल अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले. मलायका 11 वर्षांची असताना अनिल अरोरा आणि जॉयस यांचा घटस्फोट झाला असल्याचे मलायकाने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते. त्यावेळी मलायका अवघी ११ वर्षांची होती. घटस्फोटानंतर मलायका आणि तिची लहान बहीण अमृता या दोघीही आईसोबत राहत होत्या.

एका मुलाखतीत मलायका अरोराने वडिलांबद्दल बोलताना सांगितले होते की, ‘माझे आई-बाबा मी ११ वर्षांचे असताना वेगळे झाले. माझं बालपण खूप सुंदर होतं पण ते सोपं नव्हतं. ते दोघे वेगळे झाल्यानं आईकडे पाहण्याचा वेगळा आणि नवा दृष्टिकोन मिळाला.’

अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन…

अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…

अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…

The post अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka