Dailyhunt
अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या.

अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या.

चेन्नई (तमिळनाडू):प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री पवित्रा जयराम हिच्या अपघाती मृत्यूनंतर तिचा सहकलाकार आणि मित्र अभिनेता चंद्रकांत याने आत्महत्या केली आहे. एका आठवडयातच दोघांचा मृत्यू झाल्यामुळे तेलगू चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

तेलुगू अभिनेता चंद्रकांत हा चंदू नावाने प्रसिद्ध होता. त्याच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चंद्रकांत याचा तेलंगणातील अलकापूर येथील घरी मृतादेह आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता, अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. आंध्र प्रदेशातील मेहबूब नगर येथे 12 मे 2024 रोजी मोटार अपघातात अभिनेत्री पवित्रा हिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्युनंतर चंद्रकांतला धक्का बसला होता. त्यानंतर आता त्यानं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

 चंद्रकांत आणि को-स्टार पवित्रा जयराम या दोघांत खूप चांगली मैत्री होती, दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते. पवित्राच्या निधनानंतर चंद्रकांतला धक्का बसला होता. या अभिनेत्याने आपल्या मैत्रिणीसाठी सोशल मीडियावर अनेक पोस्टही शेअर केल्या होत्या. पवित्रासोबत घालवलेले सुंदर क्षण तो शेअर करत होता. तीन दिवसांपूर्वी चंद्रकांतने एका पोस्टमध्ये पवित्राला उद्देशून, ‘अरे नाना. दोन दिवस तरी थांब ना.’ अशी इमोशनल पोस्ट लिहिली होती. चंद्रकांतने दिवंगत अभिनेत्रीसोबतचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. यासोबत त्याने लिहिलं होते की, ‘गुड मॉर्निंग नाना. जिमची वेळ झाली आहे. आपल्या कोचचा नुकताच फोन आला होता. लव्ह यू.’

प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…

'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…

'देवमाणूस' फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka