मुंबई : प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचा भीषण अपघातात रविवारी (ता. १२) मृत्यू झाला असून, तिच्या कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. पवित्रा जयराम असे मृत्युमुखी पडलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातून परत येत असताना महबूब नगर येथे कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. गाडी डिव्हाइडरवर जोरात आपटली. हैदराबादहून वानापर्थीकडे येणारी बस कारच्या उजव्या बाजूला धडकली आणि अपघात झाला. अभिनेत्री पवित्राचा जागीच मृत्यू झाला. तिच्याबरोबर गाडीत असलेली तिची चुलत बहिण अपेक्षा, ड्राइव्हर श्रीकांत आणि अभिनेते चंद्रकांत हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभिनेत्री पवित्राच्या कार अपघाताचा व्हिडीओ आणि काही फोटो समोर आले आहेत. घटनास्थळावर अभिनेत्रीचा नवरा चंद्रकांत जखमी अवस्थेत पडल्याचं पाहायला मिळतंय. तर अभिनेत्री देखील गंभीर जखमी असल्याचं दिसतंय. अभिनेते चंद्रकांत यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. पत्नीच्या निधनानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पवित्राच्या बॅनरवरील फोटोकडे पाहून ते रडताना दिसत आहेत. या व्हिडीओनं चाहत्यांसह सर्वांच्यात डोळ्यात पाणी आणलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री पवित्रा ही तिलोत्तमा या टेलिव्हिजन मालिकेतून पवित्रा घराघरात पोहोचली होती. त्रिनयानी ही तिची मालिकाही खूप प्रसिद्ध झाली होती.
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…
'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…
प्रसिद्ध अभिनेत्याचा 2 लहान मुलींसह विमान अपघातात मृत्यू…
'देवमाणूस' फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

