Dailyhunt
क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात मोठं घबाड; दागिने अन् नोटांची थप्पी.

क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात मोठं घबाड; दागिने अन् नोटांची थप्पी.

बीड: बीडमध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेल्या बॅगा आणि दागिने सापडले असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. इंदापूर येथील रहिवाशी असणाऱ्या एका पोलिस निरीक्षकाने एका वर्षात तब्बल 2 कोटी 7 लाख 31 हजार रुपयांची माया कमावल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे.

या प्रकरणी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिभाऊ नारायण खाडे तत्कालीन पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, बीड (रा. विकासवाडी, पो. रेडणी ता. इंदापूर, जि. पुणे) आणि त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…

हरिभाऊ नारायण खाडे हे बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने आणि पैसे आढळून आले आहेत. खाडे यांच्या गैर कारभारामध्ये पत्नीने त्यांना मदत केल्याने खाडे दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेत असताना एक कोटीच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात त्यांच्या पत्नी मनीषा खाडे यांच्या विरोधात देखील बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खाडे यांच्या घरात एक कोटीची रोख रक्कम, एक किलो सोने अशी दोन कोटी सात लाख 31 हजार रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळून आली आहे. उत्पन्नापेक्षा तब्बल 116% अधिक ही संपत्ती होती. संपत्ती संपादित करण्यासाठी त्याच्या पत्नी मनीषा खाडे यांनी मदत केल्याने हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांची बीडमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात 16 मे 2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. चौकशी दरम्यान 10 ऑगस्ट 2023 ते 16 मे 2024 या कालावधीत हरिभाऊ खाडे यांनी त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा 2 कोटी 7 लाख 31 हजार 358 रुपये (116.28 टक्के) संपत्ती मिळवल्याच निष्पन्न झाले आहे. त्यापैकी त्याची पत्नी मनिषा खाडे हिने सुमारे 62 लाख 79 हजार 953 रुपयांची मालमत्ता स्वत:च्या नावावर करुन हरिभाऊ खाडे यांना मदत केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी हरिभाऊ नारायण खाडे त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील लाच घेणारे पाच अधिकारी निलंबीत…

घबाड सापडलं! चेकपोस्टवर 190000000 रुपयांची सोनं-चांदी जप्त…

नाशिकमध्ये सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळालं भलं मोठं घबाड….

शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरात मिळालं घबाड…

दुय्यम निबंधकाच्या घरात मिळाले मोठे घबाड…

The post क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात मोठं घबाड; दागिने अन् नोटांची थप्पी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka