Dailyhunt
बहिणीच्या पतीची म्हणजेच दाजीची शुल्लक वादातून केली हत्या.

बहिणीच्या पतीची म्हणजेच दाजीची शुल्लक वादातून केली हत्या.

नागपूर : मेहुण्यानेच शुल्लक वादातून आपल्या बहिणीच्या पतीची म्हणजेच दाजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रवी गलिचंद कहार (वय 30 मुळ राहणार मध्य प्रदेश हरई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

अरुण अन्नू बनवारी (वय 24 मुळ राहणार मध्य प्रदेश लिंगा, छिंदवाडा) असे आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच ते नागपुरात कामनिमित्त आले होते.

काही दिवसांपूर्वी रवी हा त्याचे दोन भाऊ, पत्नी, सहा वर्षांची मुलगी व चार वर्षांच्या मुलासोबत नागपुरात कामाला आला होता. तो आपल्या परिवारासोबत रचना गृनिर्माण सहकारी संस्था शिवणगाव पुनर्वसन येथे तात्पुरते घरं बांधून राहात होता. तिथेच एका गटाराच्या बांधकाम साईटवर तो आपल्या कुटुंबासोबत काम करत होता. त्याचा लहान भाऊ व कुटुंबातील इतर सदस्य हे वैद्यनाथ चौकात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर कामसाठी गेले, ते तिथेच राहु लागले होते.

रवीची पत्नी निशा ही दोन आठड्यापूर्वीच महाशिवरात्री निमित्त आपल्या गावी गेली होती. याचदरम्यान रवी आणि अरुणचे शुल्लक कारणावरून भांडण झालं, त्यानंतर अरुणने रवीला लाकडी दांडक्यानं मारहाण करत त्याची हत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस स्टेशनमध्येच पोलिसकाकावर कुऱ्हाडीनं सपासप वार…

नागपूर हादरलं! घरात तीन जणांचे मृतदेह पाहून शेजाऱ्यांना बसला धक्का…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post बहिणीच्या पतीची म्हणजेच दाजीची शुल्लक वादातून केली हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka