Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भाजप नेत्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून कुटुंबावर केला गोळीबार, तिघांचा मृत्यू.

भाजप नेत्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून कुटुंबावर केला गोळीबार, तिघांचा मृत्यू.

खनौ (उत्तर प्रदेश): भाजपच्या एका नेत्याने आपल्याच पत्नीसह तीन मुलांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन मुलांचा मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास आरोपीने आपल्या परवानाधारक बंदुकीतून हा गोळीबार केला आहे.

आरोपीने स्वत: पोलिस ठाण्यात फोन करून गोळीबार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

योगेश रोहिला असे अटक केलेल्या हल्लेखोर भाजप नेत्याचे नाव आहे. तो भाजप युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. कुटुंबावर केलेल्या बेछूट गोळीबारात मुलगी श्रद्धा (वय ११), मुलगा शिवांश (वय ४) आणि देवांश (वय ६) अशा तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. पत्नी नेहा (वय ३१) गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथं घडली आहे.

योगेश रोहिला याने शनिवारी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान त्यांच्या परवानाधारक बंदुकीतून हा गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी त्याच्या घरी धावले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, त्याची पत्नी आणि तीन मुले रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. यावेळी भाजप नेता जवळच उभा होता. जेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जमाव त्याच्या मागे धावला, त्याला पकडले आणि मारहाण केली. भाजप नेत्याने आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, योगेश याचे मानसिक स्वास्थ ठीक नव्हते. मानसिक तणावातून त्याने आपल्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

प्रेमप्रकरण! युवकाला मारहाण करत घरापर्यंत आणले अन् युवकाने घेतला गळफास…

सासऱ्याचे तीन-चार महिलांशी अनैतिक संबंध अन् सून सासऱ्याच्या खोलीत गेली अन्…

पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा…

जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक…

बीड! प्रेमसंबंधातून युवकाला बेदम मारहाण करत जागेवरचं संपवलं…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka