Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा.

पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा.

पुणे: पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील चंदननगर परिसरात असलेल्या एका दर्ग्याजवळ निर्जनस्थळी चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. IT इंजिनियर बापानेच मुलाची गळा चिरून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. यानंतर बापाने चिमुकल्याची हत्ता केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

हिंमत माधव टिकेटी (वय ३) असे हत्या झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर माधव साधुराव टिकेटी (वय ३८) असे बापाचे नाव आहे. तो पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. आरोपी माधव याचे मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीसोबत वाद सुरू होते. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय माधवला होता. यातून त्याचे अनेकदा पत्नीसोबत खटके उडत होते.

आरोपी माधव टीकेटी आणि त्याचे कुटुंब मूळचे विशाखापट्टणममधून पुणे शहरात स्थायिक झाले होते. आरोपी माधव याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, ज्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. गुरूवारी दुपारी देखील त्यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात माधव आपल्या मुलाला घेऊन घराबाहेर पडला. प्रथम तो एका बारमध्ये आणि नंतर एका सुपरमार्केटमध्ये गेला. त्यानंतर तो मुलाला चंदननगरजवळील जंगलात घेऊन गेला. रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही, तेव्हा त्याच्या पत्नीने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी माधवचा माग काढला.

माधव पहाटेच्या सुमारास चंदननगरजवळील जंगलात दारूच्या नशेत सापडला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने आपल्या मुलाचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी जंगलात शोध घेतला असता, हिम्मतचा मृतदेह एका ठिकाणी आढळून आला. माधवने आपल्या मुलाचा गळा चिरून खून केला होता. दरम्यान, या घटनेने टीकेटी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी माधव याला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! मानसी लोहगडावरील एका कठड्यावर निराश अवस्थेत बसली अन्…

पुणे! हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात नवा ट्वीस्ट…

पुणे! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांनी केला मोठा घात; धक्कादायक माहिती समोर…

आईनं 29व्या मजल्यावरून मुलीला फेकलं अन् आयुष्याचा केला शेवट…

पुणे! इंजिनिअर युवकाने अभिनेत्रीकडे पाहून केले हस्तमैथुन…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka