सांगली : भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची मिरज-पंढरपूर रस्त्यावर हत्या झाली असून, या घटनेनंतर आता सांगलीत आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मालमत्तेच्या कारणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या सुधाकर खाडे हे भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. 2014 मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. सुधाकर खाडे यांच्यावर मीरज-पंढरपूर रस्त्यावर खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. आज (शनिवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर रोड येथील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. याच वादातून संशयित व्यक्तीने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यातच खाडे यांचा मृत्यू झाला. कुऱ्हाडीने वार केल्यानंतर खाडे यांना जखमी अवस्थेत मिरजेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे घोषित केले. सदर घटनेबाबत घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत.
दरम्यान, सुधाकर खाडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात केली होती. खाडे यांनी 2014 साली तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…
मुंबईत 1 कोटी 11 लाख रुपयांचे सोन्याचे बॉल जप्त; धक्कादायक माहिती समोर…
Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका…
आर्थिक वादातून पुणे भाजप कार्यकर्त्याची हत्या, 3 जणांना अटक
भारतीय महिलेच्या खूनाची माहिती देणाऱ्याला ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून बक्षीसाच्या रकमेत वाढ…
The post भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

