बंगळुरू (कर्नाटक): एका बस चालकाला वाहन चालवत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. पण, कंडाक्टरने बसवर नियंत्रण मिळवीत प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. संबंधित घटना बसमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
किरण कुमार (वय ४०) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. किरण हे बीएमटीसी बसवर चालक म्हणून काम करत होते. किरण यांनी बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास काम सुरू केले. मात्र, त्यांना अस्वस्थ वाटत होते. किरण यांनी नेलमंगळा येथून बस चालू केली अन् दसनपुराच्या दिशेने निघाले. मात्र, गाडी चालवताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. किरण कुमार यांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, चालक किरण यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यांच्याकडून गाडीचे नियंत्रण सुटलं. त्यावेळी जवळ उभ्या असलेल्या बसला किरण यांच्या बसची धडक बसली अन् प्रवाशी घाबरले. किरण यांचा साथीदार असलेल्या बस कंडक्टरने धाव घेतली. कंडक्टरने स्वत: गाडीचे नियंत्रण घेतले आणि बस थांबवली. त्यामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला.
कंडक्टर ओबलेश यांनी बस थांबवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. ओबलेश यांनी कुमारला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, ओबलेश यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बीएमटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुमार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना मदत आणि नुकसान भरपाईचे आश्वासन दिले आहे. चालक किरण यांच्या मृत्यूचा व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Video: दिवाळी साजरी करत असताना पाया पडले अन् काका-पुतण्याची केली हत्या…
Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…
Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा…
विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…
Video: विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर लागली धावू अन्…
The post Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

