Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भावाने सख्ख्या विवाहित बहिणीची केली हत्या; कारण समोर.

भावाने सख्ख्या विवाहित बहिणीची केली हत्या; कारण समोर.

खनौ (उत्तर प्रदेश) : एका भावाने आपल्या सख्ख्या विवाहित बहिणीची हत्या केली आहे. शिवाय, बहिणीने स्वत:चं आयुष्य संपवल्याचं त्याने पोलिसांना सांगितले पण नंतर आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यातल्या बिधुना कोतवाली भागातल्या बडे पुरवा गावात ही घटना घडली. गौरवने त्याची बहीण पारुल हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. मृत पारुलच्या मानेवर संशयास्पद जखमांच्या खुणा आढळल्या. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तपास करून मृत पारूलच्या भावाची चौकशी केली आणि पोलिसांनाही धक्का बसला.

पोलिस अधीक्षक चारू निगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पारुलचा खून तिचा सख्खा भाऊ गौरव याने गळा आवळून केला आहे. आरोपीने पोलिस चौकशीत सांगितले की पारुलचं सुनील कुमारशी 2019 मध्ये लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आहे. लग्नानंतर या नवरा-बायकोमध्ये सतत वाद होत होते. गेल्या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी पारुल सासरच्या घरून आई-वडिलांच्या घरी आली आणि माहेरीच राहू लागली.

मृत महिलेचा पती सुनील म्हणाला, ‘मेहुणा गौरव याला अनेकदा पारुलला घरी पाठवण्यास सांगितले होते. गौरवने बहिणीला अनेक वेळा समजावले; पण ती ऐकत नव्हती. गौरवने बहिणीला सासरी पाठवण्यासाठी खूप समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र ती तयार झाली नाही. यावरून दोन भावा-बहिणींमध्ये वाद झाला आणि नंतर रागाच्या भरात गौरवने बहिणीचा गळा आवळून खून केला.’

सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…

सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…

पत्नीसाठी केले धर्मांतर अन् विवाहानंतर तिचीच केली हत्या…

The post भावाने सख्ख्या विवाहित बहिणीची केली हत्या; कारण समोर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka