Dailyhunt
बीड! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या.

बीड! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या.

बीड : बडतर्फ केलेले पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई येथे घडली आहे. अंबाजोगाई येथील घरी सुनिल नागरगोजे हे एकटेच असताना सोमवारी (ता.

१) रात्री त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

परभणीतील अधीक्षकांना शिवीगाळ प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. बदलीनंतर बीड येथे त्यांना नियंत्रण कक्षातच ठेवले गेले होते. परभणीच्या प्रकरणात एप्रिल 2025 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासून ते नैराश्यात होते. यानंतर बडतर्फ केलेले पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.

सुनील नागरगोजे यांचे मूळ गाव परळी तालुक्यातील नागदरा आहे. मात्र, ते अनेक वर्षांपासून कुटुंबियांसह अंबाजोगाई येथे वास्तव्यास होते. पोलिस खात्यात काम करताना त्यांनी परभणी, लातूर आणि बीड या ठिकाणी सेवा बजावली होती. लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळला होता. परभणी येथे कार्यरत असताना एका पोलिस अधीक्षकांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच, बीड येथे बदली झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्यामुळे त्यांना बीड येथे नियंत्रण कक्षातच सीमित ठेवण्यात आले होते. परभणीतील शिस्तभंग प्रकरणात एप्रिल 2025 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. बडतर्फीनंतर नागरगोजे हे नैराश्यात गेले होते.

सुनील नागरगोजे यांची मुले पुण्यात शिक्षण घेत असून, पत्नीही मुलांसोबत आहे. अंबाजोगाई येथे नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने, नागरगोजे हे भाड्याच्या घरात एकटेच राहत होते. निवासस्थानी आत्महत्या करून त्यांनी जीवन संपवले आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सुनील नागरगोजे यांनी आत्महत्या नेमकी का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुनील नागरगोजे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

बीड! सरकारी वकिलाने न्यायालयातच घेतला गळफास; मोठा ट्विस्ट…

बीड! व्हिडीओ व्हायरल म्हणून युवकाची छाटली बोटं…

बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचे दिले 'सरप्राईज गिफ्ट'

The post बीड! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka