Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीड! बॅटने बेदम मारहाण करणाऱ्या खोक्याला जामीन मंजूर.

बीड! बॅटने बेदम मारहाण करणाऱ्या खोक्याला जामीन मंजूर.

बीड : बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या युवकाला बॅटने बेदम मारहाण केलेल्या प्रकरणात सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पाच महिन्यांपूर्वी सोशल माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत चर्चेत आलेल्या व्हिडिओतून हा सर्व प्रकार समोर आला होता.

या प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बीड सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली. या प्रकरणात न्यायालयाने खोक्याला जामीन मंजूर केला आहे. बुलढाण्यातील कैलास वाघ याला सिनेस्टाईल पद्धतीने रिंगण करून सतीश भोसलेसह त्याच्या साथीदाराने बॅटने बेदम मारहाण केली होती आणि याच घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सतीश भोसले विरोधात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यात मारहाण, प्राणघातक हल्ला, फसवणूक, खुनाचा गुन्हा असे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता अशी सतीश भोसले उर्फ खोक्या याची ओळख आहे.

दरम्यान, खोक्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्ष्यात घेता काही महिन्यापूर्वी वनविभागाच्या जागेवर दुमजली इमारत आणि त्या बाजूला आलिशान ऑफिसमधून सतीश भोसले चालवत असल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अनधिकृत घरावर तसेच ऑफिसवर बुलडोझर चालवला होता. तसेच शिरूर दिवाणी व फौजदारी न्यायालयात त्याला हजर केले असता सतीश भोसलेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी सतीश भोसलेचे वाढलेले घर अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना घडली होती. यात त्याच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, जनावरांचा चारा ही खाक झाला व घराचही मोठं नुकसान झाले होते. दरम्यान सतीश भोसलेच्या कुटुंबातील महिलेला मारहाण केल्याची घटनाही घडली होती. या घटनेनंतर धाराशिवमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ आदिवासी समाज आक्रमक झाला होता.

वनविभागाकडून सतीश भोसलेच्या घरावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापुरात रास्ता रोको करण्यात आला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सतीश भोसलेच्या जातीवाचक उल्लेख करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. सतीश भोसले खोक्या नाही तर आमचा विठ्ठल असल्याचेही तेव्हा म्हटल्या जात होतं. अशातच आता सतीश भोसलेला न्यायालयाने दिलासा देत त्याचा जामीन मंजूर केला आहे.

खोक्याचे घर जाळलं; प्राण्यांचा मृत्यू तर कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप…

धक्कादायक Video: लातूरमध्ये युवकाला नग्न करून बेदम मारहाण…

The post बीड! बॅटने बेदम मारहाण करणाऱ्या खोक्याला जामीन मंजूर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka