Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बुलढाण्यात हॉटेलमध्ये प्रियकराने केला प्रेयसीवर हल्ला; दोघांचाही मृत्यू.

बुलढाण्यात हॉटेलमध्ये प्रियकराने केला प्रेयसीवर हल्ला; दोघांचाही मृत्यू.

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरात असलेल्या हॉटेल जुगनू येथे युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हॉटेल जुगनूमधील एका खोलीत हे दोघेही दुपारपासून थांबलेले असल्याची हॉटेलकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या केली.

खामगाव शहरातील बायपास परिसरात असलेल्या हॉटेल जुगनूमध्ये मंगळवारी (ता 23) सायंकाळी जिल्ह्यातीलच साखरखेर्डा येथील प्रेमीयुगोलाने रूम भाड्याने घेतली. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीची भोसकून हत्या केली व त्यानंतर स्वतःलाही चाकूने सपासप वार करत संपवलं. सोनू राजपूत व पायल पवार असे या प्रेमीयुगोलाचे नाव असून दोघेही साखरखेर्डा गावातील होते. दोघांमध्ये तीन ते चार वर्षापासून प्रेम संबंधात होते. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

मिळालेल्या आधिक माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतःलाही भोसकून आत्महत्या माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. या घटनेत दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उजेडात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये २१ वर्षीय युवती व सोनू उर्फ साहिल राजपूत (२३, दोघेही रा. साखरखेर्डा) यांचा समावेश आहे. काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातूनच साहिलने हॉटेलात युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केला. त्यानंतर स्वतःवर वार करत त्याने जीवन संपवले. नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. मृतदेहाचा पंचनामा करून त्यांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

युवकाने नवविवाहित पत्नीचा मोबाईल तपासला अन् बसला धक्का…

नाशिक! नवविवाहित पत्नीच्या प्रियकराकडून नवऱ्याचे अपहरण करण्याचा थरारक प्रयत्न…

प्रियकराला तीन बायका तर प्रेयसीला दोन नवरे; अन् पुन्हा प्रेमसंबंध…

एक प्रियकर अन् दोन मैत्रिणी! महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा…

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने बाल्कनीतून मारली उडी…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka